नक्षलवादी हल्ल्याने छत्तीसगड हादरलं, भाजप आमदारासह पाच जवानांचा मृत्यू
नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भाजप आमदारासह पाच जवान शहीद झाले आहेत. छत्तीसगडमधील दंतेवाडामध्ये ही घटना घडली. भाजप आमदार भीमा मंडावी यांचा ताफा ज्या रस्त्याने जात होता, त्या रस्त्यावर भूसुरुंग लावून स्फोट घडवण्यात आला, ज्यामध्ये आमदार आणि पाच जवानांचाही मृत्यू झाला. दंतेवाडामधील हा हल्ला नकुलनार पोलीस स्टेशन हद्दीतील श्यामगिरी क्षेत्रात झाला. आमदार श्यामगिरीहून निघताच त्यांच्या ताफ्यावर हल्ला […]
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: |
Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM
नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भाजप आमदारासह पाच जवान शहीद झाले आहेत. छत्तीसगडमधील दंतेवाडामध्ये ही घटना घडली.भाजप आमदार भीमा मंडावी यांचा ताफा ज्या रस्त्याने जात होता, त्या रस्त्यावर भूसुरुंग लावून स्फोट घडवण्यात आला, ज्यामध्ये आमदार आणि पाच जवानांचाही मृत्यू झाला.दंतेवाडामधील हा हल्ला नकुलनार पोलीस स्टेशन हद्दीतील श्यामगिरी क्षेत्रात झाला.आमदार श्यामगिरीहून निघताच त्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 11 एप्रिल रोजी बस्तर लोकसभा मतदारसंघासाठीही मतदान होणार आहे. याच प्रचारासाठी भीमा मंडावी बैठका घेत होते.भाजप आमदार भीमा मंडावी निवडणूक जाहीर झाल्यापासून भाजपच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळत होते. पहिल्यापहिल्या टप्प्यातील मतदानासाठीही त्यांनी गावोगाव बैठका सुरु केल्या होत्या.नक्षलवाद्यांनी भाजप आमदाराच्या ताफ्यावर पाळत ठेवत स्फोट घडवून आणला आणि त्यानंतर गोळीबारही केला.हल्ल्यानंतर गोळीबार करुन नक्षलवाद्यांनी जवानांकडील शस्त्र हिसकावून घेतली.