युद्धासाठी सज्ज राहा, चीनच्या अध्यक्षांचे सैन्याला आदेश

| Updated on: May 27, 2020 | 2:40 PM

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी चिनी सेनेला युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत (China President Xi Jinping).

युद्धासाठी सज्ज राहा, चीनच्या अध्यक्षांचे सैन्याला आदेश
Follow us on

बिजिंग : चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी चिनी सेनेला युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत (China President Xi Jinping). “चीनचं सार्वभौमत्व टिकवण्याची तयारी ठेवा. सेनेला प्रशिक्षण देऊन शक्ती वाढवून सज्ज ठेवा”, अशी सूचना त्यांनी केली आहे.

शी जिनपिंग यांची चिनी सेना पीपल्स लिबरेशन आर्मीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी चिनी सेना आणि सर्व अधिकाऱ्यांना संबोधित करताना युद्धासाठी सज्ज राहण्याची सूचना केली (China President Xi Jinping).

कोरोनामुळे जगभरात चीनविरोधात संताप वाढत चालला आहे. भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांसोबत चीनचे संबंध ताणले गेले आहेत. भारताच्या लडाख सीमेवर चीनकडून कुरापत्या सुरु आहेत. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर शी जिनपिंग यांच्याकडून युद्ध सज्जतेचा इशारा देण्यात आला आहे.

चिनी सेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संबोधित करताना जिनपिंग यांनी तैवान प्रदेशावरुन अमेरिका आणि चीन यांच्यात वाढलेल्या तणावावरही भाष्य केलं. “कोरोनामुळे संपूर्ण जगात चीनबाबत रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे चिनी सैन्याने सर्वात वाईट परिस्थिती आहे, अशी कल्पना करावी. त्याबाबत विचार करावा आणि तयारी करावी. सैन्याने प्रशिक्षणाचं काम वाढवावं. देशाच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी युद्धासाठी तयार राहा”, असं जिनपिंग म्हणाले.

दरम्यान, चीनसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर काल (26 मे) पंतप्रधान कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. नियंत्रण रेषा परिसरात वास्तविक काय परिस्थिती आहे? यावर चर्चा झाली. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, तिन्ही दलाचे प्रमुख, तसेच सीडीएस जनरल बिपिन रावत आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते.

हेही वाचा :

कोरोना लढाईत आम्ही आपल्यासोबत, राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन

राजभवनात गाठीभेटी सुरुच, भाजपचे आमदार-खासदार राज्यपालांच्या भेटीला

मुंबईत कोरोनाग्रस्त वाढतेच, पाच वॉर्डमध्ये प्रत्येकी 2 हजाराहून अधिक रुग्ण