मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर कारवाईच्या नावाखाली लुबाडण्याचा धंदा, केडीएमसीच्या क्लीन मार्शलला अटक

| Updated on: Sep 26, 2020 | 3:44 PM

मास्क न घालणाऱ्या नागरिकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळणाऱ्या केडीएमसीच्या एका क्लीन मार्शलला पकडून मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांचा ताब्यात दिला आहे (Clean Marshall arrested in kalyan).

मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर कारवाईच्या नावाखाली लुबाडण्याचा धंदा, केडीएमसीच्या क्लीन मार्शलला अटक
Follow us on

ठाणे : मास्क न घालणाऱ्या नागरिकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळणाऱ्या केडीएमसीच्या एका क्लीन मार्शलला पकडून मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांचा ताब्यात दिला आहे. याप्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी केडीएमसीत क्लीन मार्शलचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करत अटक केली आहे. त्याचबरोबर पोलीस अन्य तीन आरोपींचा शोध घेत आहेत (Clean Marshall arrested in kalyan).

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात दररोज सकाळी 6 ते 9 वाजेच्या सुमारास मास्क न घालणाऱ्या नागरिकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळले जात असल्याची माहिती मनसेचे कार्यकर्ते रुपेश भोईर यांना मिळाली. त्यांनी आज (26 सप्टेंबर) सकाळी रेल्वे स्टेशनबाहेर महापालिकेच्या काही कर्मचाऱ्यांना मास्क न घालणाऱ्या नागरीकांविरोधात कारवाई करताना पाहिले.

हेही वाचा : कल्याणमध्ये बोगस डॉक्टरचा सुळसुळाट, मनसेकडून दोन रुग्णालयांचा पर्दाफाश

मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे महापालिकेची पावती नव्हती. तरीदेखील ते मास्क न घालणाऱ्या नागरिकांकडून भरमसाठी दंड वसूल करत होते. रुपेश भोईर यांनी हा सर्व प्रकार बघितल्यानंतर दंड वसूल करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला. त्यावेळी दोन कर्मचाऱ्यांनी पळ काढला. पण एक कर्मचारी रुपेश यांच्या हाती लागला. रुपेश यांनी त्या कर्मचाऱ्याला कल्याणच्या महात्मा फुले ठाण्यात नेले.

रुपेश भोईर यांनी पोलिसांच्या ताब्यात दिलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्याचं नाव दिलीप सुखदेव गायकवाड असे आहे. हा कर्मचारी स्टेशन परिसरात क्लीन मार्शलचं काम करतो. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात थुंकणाऱ्या आणि अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांविरोधात कारवाई करण्यासाठी केडीएमसीने क्लीन मार्शल नेमेले आहेत. हे क्लीन मार्शल एका खाजगी एजन्सीमार्फत कंत्राटी पद्धतीने नेमले आहेत.

केडीएमसीने नेमलेल्या क्लीन मार्शलला स्टेशन परिसरात थुंकणाऱ्या आणि अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचा अधिकार आहे. मात्र, मास्क न घातलेल्या नागरिकांवर कारवाई करण्याचा अधिकार त्यांना देण्यात आलेला नाही.

तरीदेखील क्लीन मार्शल कर्मचाऱ्यांनी मास्क न घालणाऱ्या नागरीकांविरोधात कारवाई करण्याच्या नावाखाली लुबाडण्याचा धंदा सुरु केला आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी दिलीप गायकवाड विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.

संबंधित बातम्या :

Kalyan Breaking | कल्याणमध्ये वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने महिलेचा मृत्यू

कल्याणमध्ये वृद्ध महिलेचा अ‍ॅम्ब्युलन्स अभावी मृत्यू, रुग्णवाहिका न मिळाल्याने पोलीस व्हॅनमधून रुग्णालयात