Nashik| ठंडा ठंडा कूल कूल…नाशिकमध्ये थंडीची लाट, निफाडचा पारा 8.5 अंशावर; उत्तरेच्या वाऱ्याने आणले जेरीस!

| Updated on: Dec 20, 2021 | 11:44 AM

हवेतील गारव्यामुळे निफाड, लासलगाव, पिंपळगाव बसवंत ,ओझर, सायखेडा, चांदोरी गारठून निघाले आहे.

Nashik| ठंडा ठंडा कूल कूल...नाशिकमध्ये थंडीची लाट, निफाडचा पारा 8.5 अंशावर; उत्तरेच्या वाऱ्याने आणले जेरीस!
नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे.
Follow us on

नाशिक/लासलगावः सध्या नाशिकमध्ये अक्षरशः थंडीची लाट आली असून, निफाडचा पारा पुन्हा एकदा घसरून थेट साडेआठ अंशावर गेला आहे. नाशिकमध्येही तापमान जवळपास 11.4 अंशांपर्यंत घसरले आहे. त्यामुळे शहरवासीय काकडून गेले आहेत. येणाऱ्या काळात या थंडीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अशी झाली घसरण

उत्तरेकडून हिमालयाच्या पायथ्यापासूनचे थंड वारे थेट नाशिकच्या दिशेने वाहत आहे. त्यामुळे निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात 8.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. 18 डिसेंबर निफाडमध्ये 12 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. 19 डिसेंबर रोजी 10 अंश सेल्सिअसवर तापमान गेले. आता आज 20 डिसेंबर रोजी निफाडचे किमान तापमान 8.5 अंश सेल्सिअसवर गेले आहे. त्यामुळे निफाडकरांना हुडहुडी भरली आहे. थंडीपासून ऊब मिळवण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहेत. उबदार कपडे परिधान करून नागरिक गरम पदार्थांवर ताव मारताना दिसत आहेत.

द्राक्ष पिकाला चिंता

वातावरणात दररोज बदल होत आहे. हवेतील गारव्यामुळे निफाड, लासलगाव, पिंपळगाव बसवंत ,ओझर, सायखेडा, चांदोरी गारठून निघाले आहे. ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून नागरिक शेकत बसत आहेत. कडाक्याच्या थंडीचा मानवी जीवनाबरोबर पिकांवरही चांगला-वाईट परिणाम होताना दिसत आहेत. गहू आणि हरभरा पिकांना या थंडीचा फायदा होतोय. तर द्राक्षाच्या फुगवणीवर परिणाम होण्याची भीती आहे.

नागपूरही गारठले

राज्याची राजधानी नागपूरमध्ये पारा घसरला असून तापमान 7.4 अंशावर गेले आहे. ही या मोसमातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद आहे. विदर्भातील इतर शहरातील तापमान 10 अंशाच्या आसपास आहे. विदर्भात नागपूरमधील वातावरण सर्वात थंड असून उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे विदर्भात थंडीची लाट निर्माण झालीय. 24 डिसेंबर पर्यंत थंडीची लाट कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

हवामान बदलाचा तडाखा

यंदा पावसाने अक्षरशः थैमान घातले. नाशिकला तर झोडपून काढले. नांदगाव आणि मनमाडमध्ये प्रचंड अतिवृष्टी झाली. शेतकऱ्यांचे लाखो हेक्टरवरील पीक पाण्यात गेले. अगदी दिवाळीनंतरही पाऊस सुरू होता. ऐन साहित्य संमेलनाच्या पूर्वी एक दिवस अगोदर एक आणि दोन डिसेंबरला नाशिकला पावसाने झोडपून काढले. त्यामुळे येणाऱ्या काळात थंडीचा असाच जोर वाढेल का, अशी शक्यता आहे. हवामान बदलाचे भयंकर परिणाम होत आहेत. त्यामुळे हवामान तज्ज्ञांनाही योग्य अंदाज बांधणे कठीण झाल्याचे दिसत आहे.

इतर बातम्याः

Sanjay Raut| हिंदुत्वाचा पावलोपावली विश्वासघात…देशाच्या जनतेला भ्रमित करण्याचा प्रयत्न, राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल

Nashik| महापालिका निवडणुका लांबणार, अजित पवारांचे संकेत; ओबीसी जनगणना झाल्यावरच रणधुमाळी