भारतीय वंशाच्या कॉमेडियनचा दुबईत स्टेज शो दरम्यान मृत्यू

| Updated on: Jul 21, 2019 | 5:46 PM

भारतीय वंशाच्या कॉमेडियनचा दुबईत एका कॉमेडी शो दरम्यान अचानक ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. 19 जुलै रोजी दुंबईतील सिग्नेचर हॉटेलमध्ये ही घटना घडली.

भारतीय वंशाच्या कॉमेडियनचा दुबईत स्टेज शो दरम्यान मृत्यू
Follow us on

दुबई : भारतीय वंशाच्या कॉमेडियनचा दुबईत एका कॉमेडी शो दरम्यान अचानक ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. 19 जुलै रोजी दुंबईतील सिग्नेचर हॉटेलमध्ये ही घटना घडली. कॉमेडियन मंजूनाथ नायडू (36) (Comedian manjunath naidu) असं या कॉमेडियनचे नाव आहे. या घटनेमुळे कॉमेडियन विश्वात शोक पसरला आहे.

मंजूनाथ 19 जुलै रोजी दुंबईत एक कॉमेडी शो करत होता. या शो दरम्यान मंजूनाथला अचानक ह्रदय विकाराचा झटका आला आणि तो स्टेजवर कोसळला. मात्र तेथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी मंजूनाथ अभिनय करत असल्याचे वाटले म्हणून त्यांनी टाळ्या वाजवल्या. पण थोड्या वेळाने तेथे उपस्थितांना कळाले की, मंजूनाथला ह्रदय विकाराचा झटका आला. यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात हलवण्यात आले.

कॉमेडियन मंजूनाथ नायडूचे (Comedian manjunath naidu) कुटुंब चेन्नईत राहणारे आहेत. त्याचा जन्म अबू धाबीमध्ये झाला. पण त्यानंतर तो दुबईत राहू लागला.

“मंजूनाथ कार्यक्रमातील शेवटचा भाग करत होता. तो स्टेजवर गेला आणि लोकांना आपल्या गोष्टींच्या मदतीने हसवण्याचा प्रयत्न करत होता. तो आपले वडील आणि कुटुंबाबद्दल बोलत होता. तेव्हा त्याने सांगितले की त्यांला भीती वाटत आहे. यानंतर तो स्टेजवर कोसळला”, असं मंजूनाथचा जवळचा मित्र मिरादादने खलीज टाईम्सला सांगितले.