मिरा भाईंदरमध्ये 3 वर्षांच्या चिमुरडीसह एकाच दिवसात 56 रुग्ण कोरोनामुक्त

| Updated on: May 02, 2020 | 6:19 PM

ठाण्यातील मिरा भाईंदरमध्ये आज (2 मे) एकाच दिवशी 56 रुग्णांना कोरोनातून बरे झाल्याने घरी पाठवण्यात आले आहे (Corona infected 56 patients cure in Mira Bhayandar ).

मिरा भाईंदरमध्ये 3 वर्षांच्या चिमुरडीसह एकाच दिवसात 56 रुग्ण कोरोनामुक्त
Follow us on

ठाणे : महाराष्ट्रात एकिकडे कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोनावर मात करत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. ठाण्यातील मिरा भाईंदरमध्ये आज (2 मे) एकाच दिवशी 56 रुग्णांना कोरोनातून बरे झाल्याने घरी पाठवण्यात आले आहे (Corona infected 56 patients cure in Mira Bhayandar ). मिरा भाईंदरमध्ये यापूर्वीही उपचारानंतर 45 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले होते. आज यात आणखी 56 जणांची भर पडल्याने आता मिरा भाईंदरमधील बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 101 झाली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेला मोठं यश मिळत असल्याचं बोललं जात आहे.

मिरा भाईंदरमध्ये कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत होती. नुकताच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा आकडा 161 वर पोहचला. या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने बऱ्या होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या बातमीने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा दिला आहे. बरे होणाऱ्या या कोरोना रुग्णांच्या संख्येने राज्यभरात नागरिकांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे या 56 बरे होणाऱ्या कोरोना योद्ध्यांमध्ये एका 3 वर्षीय चिमुरडीचाही समावेश आहे.

कोरोनाला हरवून हे सर्वजण आता आपआपल्या घरी परतले आहेत. या सर्वांचा पालिका आयुक्त, महापौर, आमदार डॉक्टर आणि कर्मचारी यांनी टाळ्या वाजवून अभिनंदन केलं आहे. यावेळी सर्व कोरोनामुक्त रुग्णांच्या चेहऱ्यांवर हसू उमटलं होतं. मिरा भाईंदर महानगरपालिका एकाच दिवशी 56 कोरोना रुग्ण बरे करुन घरी पाठवणारी राज्यातील पहिली महानगरपालिका ठरली आहे. शहरात आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 161 वर पोहचला आहे. त्यापैकी 113 रुग्णावर उपचार सुरु होता. यानंतर आधी 45 रुग्ण आणि आता एकाच दिवशी 56 रुग्ण बरे झाल्याने एकूण 101 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आता मिरा भाईंदरमध्ये केवळ 57 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

संबंधित बातम्या :

मिरा भाईंदरमध्ये दीड वर्षाचा मुलगा कोरोनामुक्त, एका दिवसात 15 जणांना डिस्चार्ज

चेंबुरमध्ये रेशन खरेदीसाठी झुंबड, मिरा भाईंदरमध्ये भाजी मंडईत मोठी गर्दी

मिरा-भाईंदरमध्ये अल्पवयीन मुलीसह तिघांना कोरोना, आकडा 117 वर

Corona infected 56 patients cure in Mira Bhayandar