औरंगाबादचे पेट्रोलपंप सकाळी 8 ते संध्याकाळी 7 पर्यंतच सुरू, लस प्रमाणपत्र तपासणीच्या कामामुळे वेळेत कपात

| Updated on: Nov 25, 2021 | 10:22 AM

शहरातील पेट्रोल पंपांवर येणाऱ्या व्यक्तींकडे लस प्रमाणपत्र असेल तरच पेट्रोल द्यावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या तपासणीमुळे पंपांवर मनुष्यबळ कमी पडत आहे. परिणामी पेट्रोल पंप सकाळी 7 ते संध्याकाळी 8 पर्यंत सुरु राहतील, असा निर्णय पेट्रोल पंप असोसिएशनतर्फे घेण्यात आला आहे.

औरंगाबादचे पेट्रोलपंप सकाळी 8 ते संध्याकाळी 7 पर्यंतच सुरू, लस प्रमाणपत्र तपासणीच्या कामामुळे वेळेत कपात
पेट्रोलपंपावर लस प्रमाणपत्र अनिवार्य करण्यासाठी जिल्हाधिकारी आग्रही
Follow us on

औरंगाबादः जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा (Corona Vaccination) टक्का वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Sunil Chavan) यांनी मोठी मोहीम उघडली आहे. लस न घेतलेल्यांवर विविध निर्बंध लादले आहेत. नागरिकांचे लस प्रमाणपत्र तपासण्याची जबाबदारी विविध आस्थापनांवर दिली आहे. या आदेशानुसार, पेट्रोलपंप धारकांनाही पेट्रोल देण्याआधी लस प्रमाणपत्र तपासावे लागत आहे. कोव्हिड प्रतिबंधक लसीचा डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करणाऱ्या वाहनचालकालाच पेट्रोल, डिझेल द्यावे, यासाठी वाहनचालकांकडून एक फॉर्म भरून ग्यावास असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

पेट्रोलपंप धारकांकडे मनुष्यबळाची कमतरता

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पेट्रोलपंप धारकांकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे 25 नोव्हेंबरपासून पेट्रोलपंप सकाळी 8 ते रात्री 7 या वेळेतच सुरु राहतील, असा निर्णय पेट्रोल पंप असोसिएशनने बुधवारी घेतला.

पेट्रोलपंपावर लसीकरण सुरु करण्याची मागणी

पेट्रोल पंप असोसिएशनचे सचिव अखिल अब्बास म्हणाले, कोव्हिड लसीकरण वाढवण्यासाठी गर्दी असलेल्या पंपावर लसीकरण केंद्र सुरु करावे, अशी मागणी आम्ही अनेक दिवसांपासून जिल्हाधिकाऱ्यांकडे करीत आहोत. मात्र ती अद्याप मान्य झालेली नाही. आता जिल्हाधिकाऱ्यांनी लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेतलेल्या वाहन चालकालाच पेट्रोल डिझेल विक्री करा, असे निर्देश दिले. तसेच वाहनचालकाकडून एक फॉर्म भरून घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नाही, त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे अध्यक्षांनी सांगितले. शहरात एकूण 40 तर ग्रामीण भागात 250 पेट्रोलपंप असल्याचे त्यांनी नमूद केले.

इतर बातम्या-

नावातच सर्वकाही ! बेस्ट पती हवाय मग या 4 आद्य अक्षर असणाऱ्या व्यक्तींशीच लग्न करा

जे आसामनं केलं ते महाराष्ट्रानेही करावं? नवं वर्ष आई वडील, सासु सासऱ्यांसोबत घालवण्यासाठी 4 दिवसांची अतिरिक्त रजा