CORONA BCG vaccine | देशातील पहिली बीसीजी लस चाचणी पुण्यात, ससून रुग्णालयाला मान्यता

| Updated on: May 09, 2020 | 4:28 PM

देशात कोरोनाबाधितांवरील बीसीजी लसीची पहिली चाचणी पुण्यातील ससून रुग्णालयात घेण्यात (Corona BCG vaccine Test Pune) येणार आहे.

CORONA BCG vaccine | देशातील पहिली बीसीजी लस चाचणी पुण्यात, ससून रुग्णालयाला मान्यता
Follow us on

पुणे : देशात कोरोनाबाधितांवरील बीसीजी लसीची पहिली चाचणी पुण्यात घेण्यात (Corona BCG vaccine Test Pune) येणार आहे. पुण्यातील ससून रुग्णालयाला याबाबतची मान्यता मिळाली आहे. ही बीसीजी लस कोविड 19 च्या उपचारात काय भूमिका बजावते, यासाठी मुंबईतील हाफकिन इन्सिट्यूटमध्ये संशोधन सुरु आहे. त्या अंतर्गत ही परवानगी देण्यात आली आहे.

बीसीजी लस ही क्षयरोगासाठी वापरली जाते. पुढील आठवड्यापासून या लसीची चाचणी घेण्यात (Corona BCG vaccine Test Pune) येणार आहे. यासाठी त्यासाठी मध्यम स्वरुपातील कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची निवड केली जाणार आहे. या रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्यांवर या काळात विशेष लक्ष दिले जाणार आहे.

बीसीजी लस म्हणजे काय?

क्षयरोग प्रतिबंधक लस (बीसीजी) ही लस प्रामुख्याने क्षयरोगा (टीबी) साठी वापरली जाते. ज्या देशात क्षयरोग किंवा कुष्ठरोग सामान्य आहे तेथे निरोगी बालकांमध्ये जन्मानंतर लगेचच एक डोस देण्याची शिफारस केली जाते.

क्षयरोग सामान्य नसलेल्या भागांमध्ये केवळ जास्त धोका असलेल्या मुलांनाच विशेषत: लसीकरण केले जाते.

तर क्षयरोगाचा संशय असलेल्या प्रकरणांमध्ये वैयक्तिकरित्या तपासणी आणि उपचार केले जातात.

ज्या प्रौढांना क्षयरोग नाही आणि पूर्वी लसीकरण केले गेलेले नाही. पण, वारंवार त्यांना लक्षणे आढळून आले आहे. त्यांनादेखील लसीकरण केले जाऊ शकते.

बीसीजीची बुरुली अल्सर संसर्ग आणि इतर नॉनट्यूबरक्युलस मायकोबॅक्टेरिया संसर्ग याविरुद्धदेखील थोडी परिणामकारकता आहे. याव्यतिरिक्त ती काहीवेळा मूत्राशयाच्या कर्करोगाच्या उपचाराचा भाग म्हणून वापरली जाते.

पुण्यात कोरोनाची सद्यस्थिती काय?

पुणे शहर आणि ग्रामीणमध्ये 2 हजार 048 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यातील 136 जणांचा मृत्यू  झाला आहे. तर 61 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, विविध रुग्णालयांतील 76 जणांची स्थिती गंभीर आहे.

सद्यस्थितीत पुण्यात मृत्यूदर 5.8 टक्के इतका आहे. तर त्या खालोखाल महाराष्ट्राचा मृत्यूदर हा 3.9 टक्के आहे. त्यानंतर भारताचा मृत्यूदर 3.4 टक्के इतका आहे. पुण्यातील मृत्यूदर हा राज्यापेक्षा आणि देशापेक्षा सर्वाधिक आहे. या मृत्यूदरात सातत्याने वाढ होत असल्याने पुणेकरांची चिंता कायम आहे.

(Corona BCG vaccine Test Pune)

संबंधित बातम्या : 

पुण्यात एका दिवसात 12 कोरोनाबळी, मृत्यूदर जैसे थे! पुणेकरांची चिंता कायम

पुण्यात आणखी 99 कोरोना रुग्णांची वाढ, एकूण आकडा 2245 वर