काळवीट शिकार प्रकरण : जोधपूर न्यायालयात सलमानला हजर राहण्याचे आदेश

| Updated on: Sep 27, 2019 | 8:58 AM

काळवीट शिकार प्रकरणी (Black Hunting Case) आज (27 सप्टेंबर) बॉलिवूड अभिनेता सलमान खानला (Actor Salman Khan) जोधपूर न्यायालयात (Jodhpur Court) हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

काळवीट शिकार प्रकरण : जोधपूर न्यायालयात सलमानला हजर राहण्याचे आदेश
Follow us on

जयपूर : काळवीट शिकार प्रकरणी (Black Hunting Case) आज (27 सप्टेंबर) बॉलिवूड अभिनेता सलमान खानला (Actor Salman Khan) जोधपूर न्यायालयात (Jodhpur Court) हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आज जिल्हा सत्र न्यायलयात सुनावणी होणार आहे.

काळवीट शिकार प्रकरणात (Black Hunting Case) जोधपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयाकडून सलमान खानला (Actor Salman Khan) पाच वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. पण शिक्षा सुनावल्यानंतर लगेचच त्याला जामीनही मंजूर करण्यात आला होता. पण सुनावणी दरम्यान, सलमानला न्यायालयात उपस्थित राहावे लागेल, असे आदेशही न्यायालयाने दिले होते.

गेल्या सुनावणी दरम्यान सलमान न्यायलयात हजर राहिला नव्हता. त्यानंतर, न्यायाधिशांनी सलमानच्या वकिलांना खडसावले होते. नंतरच्या सुनावणी दरम्यान सलमानने उपस्थित राहणे गरजेचे आहे. तसेच जर तो सुनावणी दरम्यान उपस्थित राहिला नाही, तर त्याचा जामीन रद्द करण्यात येईल, अशी ताकीदही न्यायाधिशांनी दिली होती.

यावेळीही सलमान खान न्यायालयात उपस्थित राहिला नाही, तर त्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण सलमान खानच्या उपस्थितीवर संशय व्यक्त केला जात आहे. कारण अजूनही सलमानने चार्टर किंवा फ्लाईटचे तिकीटही बुक झालेले नाही.

दरम्यान, 1998 मध्ये ‘हम साथ साथ है’ या सिनेमाच्या शुटिंग दरम्यान, या सिनेमातील कलाकार सलमान खान, सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि स्थानिक व्यक्ती दुश्यंत सिंह यांनी काळवीटाची शिकार केली होती. त्यामुळे या खटल्यात हे सर्वजण आरोपी आहेत.