भारताच्या पहिल्या कोरोना लसीची किंमत किती असणार? भारत बायोटेक कंपनीचे एमडी म्हणतात….

| Updated on: Aug 05, 2020 | 12:41 AM

भारत बायोटेक कंपनीने भारतातील पहिला कोरोना लस तयार केली आहे. या लसीची सध्या मानवी चाचणी सुरु आहे (Covaxin cost wil be less than water bottle).

भारताच्या पहिल्या कोरोना लसीची किंमत किती असणार? भारत बायोटेक कंपनीचे एमडी म्हणतात....
Follow us on

हैदराबाद : भारताच्या पहिल्या कोरोना लसीबाबत अनेकांना मनात उत्सुकता आहे (Covaxin cost wil be less than water bottle). कोरोना लस कधी येणार? या लसीची किंमत किती असणार? सर्वसामान्य गरिब व्यक्ती ही लस खरेदी करु शकेल का? असे अनेक सवाल लाखो लोकांच्या मनात आहेत. मात्र, भारताची पहिल्या कोरोना लसीची किंमत ही एका पाणी बॉटलच्या किंमतीपेक्षाही कमी असावी, असं आमचं ध्येय असल्याचं भारत बायोटेक कंपनीचे एमडी कृष्णा एला म्हणाले आहेत (Covaxin cost wil be less than water bottle).

भारत बायोटेक कंपनीने भारतातील पहिला कोरोना लस तयार केली आहे. या लसीची सध्या मानवी चाचणी सुरु आहे. या लसीकडे देशभरातील नागरिकांना प्रचंड अपेक्षा आहेत. त्याच पार्श्वभूमीवर तेलंगणाचे मंत्री के. तारका रामराव यांनी मंगळवारी (4 ऑगस्ट) सकाळी भारत बायोटेक कंपनीला भेट दिली. यावेळी त्यांनी कंपनीच्या संचालकांसोबत कोरोना लसीच्या प्रगतीबाबत चर्चा केली.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज

“आम्हाला कोवॅक्सिन लस तयार करताना चांगला अनुभव आला. या लसीच्या निर्मितीसाठी यीएस आणि जागतिक आरोग्य संघटनेचा आम्हाला चांगला पाठिंबा मिळत आहे. या शत्रूविरोधात लढण्यासाठी आम्ही एकत्र काम करत आहोत. कोरोना लसीची किंमत पाण्याच्या बॉटलपेक्षाही कमी असावी, असं आमचं ध्येय आहे”, असं बायोटेक कंपनीचे एमडी कृष्णा एला यांनी सांगितलं.

“कोवॅक्सिनच्या मानवी चाचणीच्या पहिल्या टप्प्यात ज्या स्वयंसेवकांना लस देण्यात आली त्यांच्यावर कोणताही प्रतिकूल परिणाम झाल्याची तक्रार नाही. तसेच डॉक्टरांनी 14 दिवसांपूर्वी डोस दिलेल्या स्वयंसेवकांना दुसरा डोस देण्यास सुरुवात केली आहे. कोवॅक्सिनच्या मानवी लसीचा दुसरा टप्पा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरु होण्याची शक्यता आहे. तर 2021 च्या पहिल्या सहा महिन्यात कोवॅक्सिन बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे”, असंदेखील एमडी कृष्णा एला यांनी सांगितलं.