महानगरपालिकेच्या सहा जम्बो कोविड रुग्णालयांमध्ये वर्षभरात 89 हजारांपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार

| Updated on: Jun 05, 2021 | 3:40 PM

एकूण 8915 खाटांच्या या सहा रुग्णालयांमध्ये आतापर्यंत तब्बल 89 हजार 206 रुग्णांवर परिणामकारक वैद्यकीय उपचार करण्यात आले. | Covid centre

महानगरपालिकेच्या सहा जम्बो कोविड रुग्णालयांमध्ये वर्षभरात 89 हजारांपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार
Follow us on

मुंबई: राज्यात कोरोनाची साथ आल्यानंतर मुंबईत उभारलेल्या तात्पुरत्या कोविड रुग्णालयांमध्ये वर्षभरात तब्बल 89 हजारांपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सन 2020 मध्ये कोविडच्या सुरुवातीच्या काळात कोविड बाधित रुग्णांना रुग्णालयात ‘बेड’ मिळण्यात अडचणी येत असल्याने रुग्णालयांची क्षमता वाढविणे गरजेचे होते. (Covid centre in Mumbai)

मात्र, अत्यंत कमी कालावधीत नवीन रुग्णालय बांधून रुग्ण शय्या अर्थात बेडची संख्या वाढविणे अशक्‍यच होते. ही बाब लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने उपलब्ध असलेल्या जागांचा उपयोग करून तात्पुरत्या स्वरूपातील कोविड समर्पित भव्य रुग्णालये म्हणजेच ‘जंबो कोविड रुग्णालय’ उभारण्याचा निर्णय घेतला.

यानुसार पहिले रुग्णालय वरळी परिसरातील राष्ट्रीय क्रीडा संकुलामध्ये (एन.एस.सी.आय.) कार्यान्वित करण्यात आले. त्यानंतर वांद्रे-कुर्ला संकुल, गोरेगाव, भायखळा, मुलुंड आणि दहिसर या ठिकाणी देखील तात्पुरत्या स्वरूपातील कोविड समर्पित रुग्णालये कार्यान्वित करण्यात आली. या एकूण 8915 खाटांच्या या सहा रुग्णालयांमध्ये आतापर्यंत तब्बल 89 हजार 206 रुग्णांवर परिणामकारक वैद्यकीय उपचार करण्यात आले. यासाठी 1157 डॉक्टर्स, 1137 परिचारिका, 1180 वॉर्डबॉय यांच्यासह साधारणपणे 4658 इतके मनुष्यबळ कार्यरत आहे.

राज्यात 14,152 नव्या रुग्णांची नोंद

राज्यात शुक्रवारी कोरोनाचे 14,152 नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. तर 289 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. 1,96,894 सक्रिय रुग्ण आहेत. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 58,05,565 झालीय.

संबंधित बातम्या:

मुंबई महानगरपालिकेचा मोठा निर्णय, आता हॉटेल-रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांचंही प्राधान्यक्रमानं लसीकरण

दिलासादायक! राज्यात आज 14,152 नव्या रुग्णांची नोंद, 289 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

(Covid centre in Mumbai)