मुंबई महानगरपालिकेचा मोठा निर्णय, आता हॉटेल-रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांचंही प्राधान्यक्रमानं लसीकरण

मुंबई महानगरपालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. बीएमसीने आता हॉटेल, रेस्टॉरंटमधील कामगारांचे प्राधान्याने लसीकरण करण्याचं ठरवलं आहे.

मुंबई महानगरपालिकेचा मोठा निर्णय, आता हॉटेल-रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांचंही प्राधान्यक्रमानं लसीकरण
प्रातिनिधिक फोटो


मुंबई : कोरोनापासून बचावाचा एकमेव मार्ग कोरोना विरोधी लसीकरण हाच असल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत. त्यामुळेच देशभरात कोरोना लसीकरणावर भर दिला जातोय. मात्र, लसींचा तुटवडा हा त्यातील मोठा अडसर आहे. यासाठी लसीकरणाचा प्राधान्यक्रम ठरवला जात आहे. या आता मुंबई महानगरपालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. बीएमसीने आता हॉटेल, रेस्टॉरंटमधील कामगारांचे प्राधान्याने लसीकरण करण्याचं ठरवलं आहे. मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंटमधील 18 वर्षांवरील सर्व कामगारांचं लसीकरण करण्यात येणार आहे (BMC decision on vaccination of hotel and restaurant workers in Mumbai).

मुंबई महानगरपालिकेने या लसीकरणासाठी नियोजनही सुरू केलंय. यानुसार बीएमसीने आयुक्तांनी सर्व 24 वॉर्डांमधील हॉटेल, रेस्टॉरंटमधील कामगारांची एकूण संख्या सोमवारपर्यंत कळवण्याचे आदेश सहायक आयुक्तांना दिले आहेत. ही आकडेवारी आली की त्यानुसार लसीकरणाचे टप्पे आणि नियोजन करण्यात येणार आहे.

‘स्पुटनिक’साठी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजसोबत चर्चा सुरु, ग्लोबल टेंडर रद्द झालं तरी मुंबईला लस मिळणार

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाकडून लसीकरणावर भर दिला जात आहे. अशावेळी मुंबई महापालिकेने कोरोना लसींसाठी काढलेलं ग्लोबल टेंडर निविदा प्रक्रियेत भाग घेतलेल्या 9 कंपन्यांपैकी एकही कंपनी पात्र ठरली नसल्यानं हे टेंडर रद्द करण्यात आलं आहे. असं असलं तरी स्पुटनिक या रशियाच्या लसीचे वितरक डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्याशी चर्चा सुरु आहे. त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर काही प्रमाणात स्पुटनिक लसींचा साठा महानगरपालिकेला देण्याची तयारी दर्शविली असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आलीय.

मुंबई महापालिकेला कोरोना लस पुरवठा करण्यासाठी प्रशासनाने जागतिक स्तरावर 12 मे 2021 रोजी स्वारस्य अभिव्यक्ती (Expression of Interest) प्रकाशित केली. त्याला प्रतिसाद देणाऱ्या संभाव्य पुरवठादारांना (Supplier)आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी प्रशासनाने सुरुवातीला 25 मे 2021 पर्यंत आणि दुसऱ्यावेळी 1 जून 2021 पर्यंत अशी दोनवेळा मुदतवाढ दिली. तसेच कागदपत्रांची पूर्तता करण्याचे निर्देश देऊन दूरदृश्य प्रणालीद्वारे सातत्याने चर्चादेखील केली, अशी माहितीही महापालिकेनं दिलीय.

जून अखेरिस स्पुटनिक लस मिळणार

असं असलं तरी मुंबई महापालिका प्रशासनाने कोविड प्रतिबंधक लस साठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरु ठेवले आहेत. प्रशासनाकडून अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी स्पुटनिक लसीचे वितरक डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्याशी आज चर्चा केली. त्यानुसार, प्रायोगिक तत्वावर स्पुटनिक लसीचा काही प्रमाणात साठा बृहन्मुंबई महानगरपालिकेला जून 2021 अखेरपर्यंत देण्याची तयारी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांनी दर्शविली आहे.

8 ते 10 दिवसांत पुन्हा चर्चा केली जाणार

स्पुटनिक लसीच्या शीतगृहातील साठवणुकीचे निकष वेगळे आहेत. त्यामुळे हा साठा मिळाल्यानंतर त्याच्या शीतगृहातील साठवणुकीची चाचपणी करण्यात येईल. तसेच जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांत स्पुटनिक लसीचा साठा मोठ्या प्रमाणात देण्याबाबतही रेड्डीज लॅबोरेटरीजकडे विचारणा करण्यात आली आहे. यानुसार येत्या 8 ते 10 दिवसांत पुन्हा डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्यासमवेत चर्चा केली जाणार असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.

संबंधित व्हिडीओ :

हेही वाचा :

विद्यार्थ्यांसाठी दोन डोसमधील कालावधी कमी करा, मुंबई मनपाचं केंद्राल पत्र

‘स्पुटनिक’साठी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजसोबत चर्चा सुरु, ग्लोबल टेंडर रद्द झालं तरी मुंबईला लस मिळणार

‘पालिकेचे ग्लोबल टेंडर म्हणजे बिरबलाची खिचडी होती’, भाजपचा शिवसेनेवर हल्लाबोल

BMC decision on vaccination of hotel and restaurant workers in Mumbai

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI