मास्क लावण्यास सांगितल्याचा राग, सीआरपीएफ जवानाचा पोलिसांवर हल्ला

| Updated on: Apr 28, 2020 | 11:57 AM

सीआरपीएफ जवानाने बेळगाव येथे पोलिसांवर हल्ला केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन घोषित (Soldier attack on police belgaon) करण्यात आला आहे.

मास्क लावण्यास सांगितल्याचा राग, सीआरपीएफ जवानाचा पोलिसांवर हल्ला
महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्या व्यक्तीला 1 तास झाडूने रस्ता स्वच्छ करावा लागतो.
Follow us on

बेळगाव : मास्क लावण्यास सांगितल्याच्या रागातून सीआरपीएफ जवानाने पोलिसांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. (CRPF jawan attacks on police Belgaum) बेळगावात ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी सुट्टीवर आलेला जवान सचिन सावंत यांना (CRPF jawan attacks on police Belgaum)अटक करुन गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन सावंत हे मित्रांसोबत फिरत असताना त्यांच्या तोंडावर मास्क नसल्याने, पोलिसांनी त्यांना मास्क लावण्यास सांगितलं. यावेळी त्यांची पोलिसांशी बाचाबाची होऊन संतप्त झालेल्या जवानाने पोलिसांवर हल्ला केला.

बेळगावचे जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी याबाबतची अधिक माहिती दिली.  “कोरोनामुळे लॉकडाऊन असूनही, जवान सचिन सावंत आणि त्याचे मित्र रस्त्यावर फिरत होते. कोणीही मास्क घातलेला नव्हता. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या दोन पोलिसांनी जवानाची  चौकशी केली. त्यावेळी या जवानाने मला विचारणारे तुम्ही कोण आहात? असा प्रश्न केला. याचा परिणाम जवान आणि पोलीस यांच्यात शाब्दिक चकमक झाली.  संतप्त जवानाने पोलिसांवर हल्ला केला आणि या कारणासाठी त्याला अटक करण्यात आली”

लक्ष्मण निंबरगी यांनी या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.

पोलिसांना मारहाण करण्यात आलेला सीआरपीएफ जवान सचिन सावंत पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर कलम 353, 323 आणि 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीआरपीएफ जवान सचिन सुनील सावंत हा गुरुवारी (23 एप्रिल) सकाळी शहराच्या मध्यभागी असणाऱ्या बाजारपेठ मार्गावर आपल्या घराजवळ तोंडाला मास्क न लावता बसला होता. यावेळी सदलगा पोलीस स्थानकाचे सी. जे. सारापुरे आणि सहाय्यक इराण्णा हुनशाळे गस्त घालत असताना, त्यांनी मास्क घालण्याचे आणि घरात जाण्यास बजावलं.

यावेळी शाब्दिक चकमकीनंतर सीआरपीएफ जवान सचिन सावंत याने पोलिसांवर हल्ला केला आणि त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यामुळे काहीकाळ गोंधळ निर्माण झाला होता. या घटनेची नोंद सदलगा पोलिस स्थानकात झाली असून सचिन सावंत या जवानाची बेळगावच्या हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार अधिक तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या :

वर्धा : क्लास वन अधिकारी ते कर्मचाऱ्यांकडून सीमोल्लंघन, प्रशासनाकडून कारवाईचा बडगा

मालेगावात आणखी 36 कोरोना पॉझिटिव्ह सापडले, 9 वर्षाच्या मुलाचाही समावेश