Cyclone Burevi : ‘निवार’नंतर केरळ-तामिळनाडूला बुरेवी चक्रीवादळाचा धोका, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडून मदतीचे आश्वासन

| Updated on: Dec 03, 2020 | 3:36 PM

निवार या चक्रीवादळानंतर बंगालच्या उपसागरात आणखी एक चक्रीवादळ घोंघावत आहे. या वादळामुळे तामिळनाडू आणि केरळ राज्यांना धोका निर्माण झाला आहे.

Cyclone Burevi : निवारनंतर केरळ-तामिळनाडूला बुरेवी चक्रीवादळाचा धोका, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडून मदतीचे आश्वासन
Follow us on

चेन्नई : निवार (Nivar Cyclone) या चक्रीवादळानंतर बंगालच्या उपसागरात आणखी एक चक्रीवादळ (Cyclone) घोंघावत आहे. या वादळामुळे तामिळनाडू (Tamilnadu) आणि केरळ (Kerala) राज्यांना धोका निर्माण झाला आहे. या चक्रीवादळाला बुरेवी असं नाव देण्यात आलं असून शुक्रवारी ते केरळ आणि तमिळनाडूच्या किनाऱ्यावर धडकणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. मासेमारीसाठी समुद्रकिनाऱ्यावर अथवा खाडीत जाऊ नये, असे आवाहन मच्छिमारांना करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात निवार या चक्रीवादळाने दक्षिणेकडी राज्यांमध्ये मोठे नुकसान केले होते. प्रामुख्याने तामिळनाडू आणि पुद्दुचेरीला मोठा फटका बसला होता. (Cyclone Burevi threatens Kerala-Tamil Nadu, PM Narendra Modi and Home Minister assure help to CM of both states)

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah ) यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार चक्रीवादळ बुरेवीवर (Cyclone Storm Burevi) लक्ष ठेवून आहेत. तसेच या काळात केंद्र सरकार तामिळनाडू आणि केरळमधील नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्यास वचनबद्ध आहे. गृहमंत्र्यांनी याबाबत तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी (K. Palaniswami) आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन (Pinarayi Vijayan) यांच्याशी फोनवर बातचित केली. दोन्ही मुख्यमंत्र्यांना शाह यांनी मदतीचे आश्वासन दिले आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याची बातचित करुन त्यांना आश्वस्त केले होते.

दरम्यान, हवामान विभागाकडून दोन्ही राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तमिळनाडू आणि केरळमध्ये या चक्रीवादळाचा धोका सर्वाधिक आहे. बुधवारी संध्याकाळी बुरेवी चक्रीवादळ श्रीलंकेच्या किनारपट्टीवरून पुढे सरकेल. 3 डिसेंबर रोजी मुन्नारकडे तर 4 डिसेंबरला कन्याकुमारी ते तमिळनाडूच्या दिशेने जाईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

या वादळामुळे 4 डिसेंबरपर्यंत मासेमारीचे बंद ठेवण्याचा इशारा मच्छिमारांना देण्यात आला आहे. 2 आणि 4 डिसेंबर रोजी तामिळनाडूमधील कोमोरीन परिसर, मन्नारचे आखात, तामिळनाडू आणि केरळच्या दक्षिण किनारपट्ट्यांलगतच्या भागात समुद्र खवळलेला असेल, असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

चक्रीवादळ बुरेवीच्या पार्श्वभूमीवर केरळमधील तिरुअनंतपुरम, कोल्लम, पठानमथिट्टा आणि अलाप्पुझा जिल्ह्यांमध्ये आज (3 डिसेंबर) रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने सांगितले की, चक्रीवादळ 4 डिसेंबरपर्यंत दक्षिण तमिळनाडूला पोहोचेल. 2 ते 4 डिसेंबरदरम्यान दक्षिण तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

‘निवार’मुळे तामिळनाडूत हाहा:कार

तामिळनाडू आणि पद्दुचेरीत गेल्या आठवड्यात निवार नावाचं भयानक चक्रीवादळ आलं होतं. या चक्रीवादळामुळे अनेक भागांमध्ये प्रचंड मुसळधार पाऊस पडला होता. अनेक भगांमध्ये पाणी साचलं होतं. या नैसर्गिक आपत्तीत तीन जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. तर तीन नागरिक जखमी झाले.

निवार चक्रीवादळामुळे 26 गुरे-ढोरेंचा बळी गेला. तर 101 घरे नेस्ताबूत झाले होते. जवळपास 380 झाडं पडले. 14 एकर केळीच्या बागेचं नुकसान झालं. विशेष म्हणजे चक्रीवादळ येण्याआधी प्रशासनाने जवळपास एक लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवलं होतं. चक्रीवादळानंतरही प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड मदत केली. मात्र, या चक्रीवादळाने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले.

इतर बातम्या 

‘निवार’ची झळ सोसत असताना तामिळनाडूवर पुन्हा संकटाचं सावट, आणखी एक भयावह चक्रीवादळ धडकण्याची शक्यता

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा 8वा दिवस, राज्यात शेतकरी संघटनांचं उग्र आंदोलन, तर प्रत्येक तालुक्यात काँग्रेसचा एल्गार

(Cyclone Burevi threatens Kerala-Tamil Nadu, PM Narendra Modi and Home Minister assure help to CM of both states)