Eknath Shinde: ‘निराधार, कपोलकल्पित आणि बालिश आरोप…’ एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींवर घणाघात!

स्वतःची बुडती नाव वाचवण्यासाठी आणि प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी आता ते 'फोन टॅपिंग'सारखे निराधार, कपोलकल्पित आणि बालिश आरोप करत आहेत," असा घणाघात एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

Eknath Shinde: निराधार, कपोलकल्पित आणि बालिश आरोप... एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींवर घणाघात!
| Updated on: Nov 13, 2026 | 6:53 PM

Eknath Shinde on Rahul Gandhi:  काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. माझा फोन टॅप केला जात आहे, असा खळबळजनक दावा राहुल गांधी यांनी केला आहे. मागील काही दिवसांपासून माझा फोन टॅप होत आहे, त्यासंबंधीचे सर्व पुरावे माझ्या फोनमध्ये आहेत, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांच्या या आरोपानंतर आता राजकारण चांगलंच तापले आहे. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उथळ पाण्याला खळखळाट फार असं म्हणत राहुल गांधींच्या या आरोपांवरुन सडकून टिका केली आहे.

काय म्हणालेत एकनाथ शिंदे?

Loading...

“उथळ पाण्याला खळखळाट फार.. राहुल गांधी यांना सध्या ‘मोदी फोबिया’ने इतके पछाडले आहे की त्यांना उठता-बसता, जागता-झोपता फक्त नरेंद्र मोदीजीच दिसतात. सत्य हेच आहे की, जोपर्यंत ते पंतप्रधानांचे नाव घेत नाहीत, तोपर्यंत त्यांची बातमीही होत नाही आणि माध्यमांच्या चर्चेतही ते टिकू शकत नाहीत. स्वतःची बुडती नाव वाचवण्यासाठी आणि प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी आता ते ‘फोन टॅपिंग’सारखे निराधार, कपोलकल्पित आणि बालिश आरोप करत आहेत,” असा घणाघात एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

तसेच “ना कोणता ठोस मुद्दा, ना विकासाचे व्हिजन, ना दाव्यांच्या पुष्ट्यर्थ एकही पुरावा! फक्त खिशात पुरावे असल्याच्या पोकळ बाता मारायच्या, हवेत तीर सोडायचे आणि रोज नवा ‘फेक नॅरेटिव्ह’ रचायचा, हाच त्यांचा आता ‘फुल-टाइम’ उद्योग झाला आहे. एकीकडे देश पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली प्रगतीचे नवे शिखर गाठत असताना, दुसरीकडे विरोधी पक्षनेते मात्र अशा हास्यास्पद विधानांनी स्वतःचेच हसे करून घेत आहेत. ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ ही म्हण आज त्यांच्या बाबतीत तंतोतंत खरी ठरते,” असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.

दरम्यान, राहुल गांधींनी केलेल्या फोन टॅपिंगच्या आरोपानंतर राज्यातील काँग्रेस नेते आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी यांनी केलेले फोन टॅपिंगचे आरोप खोटे नसून ती वस्तुस्थिती आहे. याआधी माझाही फोन टॅप केला होता, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे. तसेच हा प्रकार न थांबल्यास जनआंदोलन करु असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us