विवाहबाह्य संबंधांची संसारात ठिणगी, पती-पत्नीचा वाद ‘भरोसा सेल’मध्ये; नाशिक पोलीस घडवताहेत समेट

शहर पोलिसांच्या 'भरोसा सेल'मध्ये मागील सहा महिन्यात पती-पत्नीच्या वादाचे तब्बल 550 अर्ज दाखल झाले आहेत.

विवाहबाह्य संबंधांची संसारात ठिणगी, पती-पत्नीचा वाद 'भरोसा सेल'मध्ये; नाशिक पोलीस घडवताहेत समेट
Follow us
| Updated on: Oct 20, 2020 | 5:12 PM

नाशिक : शहर पोलिसांच्या ‘भरोसा सेल’मध्ये मागील सहा महिन्यात पती-पत्नीच्या वादाचे (Divorce Cases Increases In Lockdown) तब्बल 550 अर्ज दाखल झाले आहेत. यात मुख्य कारण विवाहबाह्य संबंध ठरत असून यामुळे अनेक कुटुंब उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पती पत्नीचं समुपदेशन करुन त्यांच्यात तडजोड करण्याचे काम नाशिकचं भरोसा सेल करत आहे (Divorce Cases Increases In Lockdown).

लॉकडाऊनमध्ये ज्या प्रकारे नागरिकांचे उद्योग धंदे, नोकऱ्या गेल्या, तसेच अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गवर आहेत. अनैतिक, विवाहबाह्य संबंध याचे मुख्य कारण ठरत आहे. लॉकडाऊन काळात सगळ्यांच्या मनाविरुद्ध घरात राहणे भाग पडले होते. या काळात कधी नाही इतका वेळ पती-पत्नींनी एकत्र घालवला.

कुटुंबासोबत कधी नाही तो इतका वेळ घालवण्याचा अनेकांना फायदा झाला. तर काही कुटुंबात पती-पत्नीचे विवाहबाह्य संबंधांचे बिंग फुटले आणि यातून निर्माण झालेले वाद पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन घटस्फोटपर्यंत पोहोचले आहेत. एकट्या नाशिकच्या भरोसा सेलमध्ये गेल्या सहा महिन्यात पती-पत्नीच्या वादाचे 375 हून अधिक अर्ज दाखल झाले आहेत.

महिलांवर होणारे मानसिक, शारीरिक अत्याचार, हुंडाबळी सारख्या घटनांना न्याय देण्यासाठी पोलिसांकडून भरोसा सेलची स्थापणा करण्यात आली. मात्र, लॉकडाऊन काळात पती-पत्नीच्या वादाचे प्रकरण वाढल्याने भरोसा सेलमधील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवरील ताण देखील वाढला आहे.

लॉकडाऊन काळात आमच्याकडे 550 अर्ज दाखल झाले असून लॉकडाऊन काळात पती-पत्नीने बराच काळ एकत्र घालवल्याने अनेकांमधील वाद उफाळून आले आहेत. यात आर्थिक परिस्थिती, मानसिक त्रासासोबतच विवाहबाह्य अनैतिक संबंध हे प्रमुख कारण दिसून येत आहे. अनेक महिलांनी वादाची वेगवेगळी कारणं सांगितली आहेत. यात पती घरी कुटुंबाला वेळ देत नाही, रात्री उशिरा घरी येणे, पती-पत्नी मधील संवादाचा अभाव, आर्थिक टंचाई अशा अनेक प्रश्नांवरुन पती-पत्नीमध्ये वाद होत आहे. असे प्रकरण हाताळताना आम्ही पती-पत्नीची बाजू ऐकून समजून घेतो. बऱ्याच प्रकरणात पती किंवा पत्नी लगेच विवाहबाह्य संबंधांबाबत लगेच उघड होत नाही. मग अशावेळी त्यांना विश्वासात घेऊन त्यांना कुटुंब जबाबदारी, मुले, सामजिक भान यांची माहिती करुन त्यांना समुपदेशन करावे लागत असल्याचे भरोसा सेलच्या महिला अधिकाऱ्यांनी सांगितलं (Divorce Cases Increases In Lockdown).

दरम्यान पती-पत्नीचे वाद न्यायालयात पोहोचल्यानंतर आधी मध्यस्तीचा प्रयत्न केला जातो. मात्र, अनेक जणांचा भर वेगळं राहण्यावर असल्याचं जेष्ठ विधिज्ञ धर्मेंद्र चव्हाण सांगतात.

दोन वेगवेगळ्या कुटुंबातून पती, पत्नी एकत्र येत असतात. अशात प्रत्येकात चांगले तसेच वाईट गुण असतात. आज कोणीही परिपूर्ण नाही. त्यामुळे पती-पत्नीत संवाद असणे गरजेचे आहे. एकमेकांनी दोघांची काळजी घेणं महत्वाचे आहे. तसेच, एकमेकांवर विश्वास असला तर पती-पत्नीमधील वाद टाळता येऊ शकेल, असे मतं मानसोपचार तज्ञ जयंत ढाके यांनी व्यक्त केलं.

Divorce Cases Increases In Lockdown

संबंधित बातम्या :

पती मुंबईत, पत्नी सोलापुरात, कौटुंबीक न्यायालयाकडून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घटस्फोट

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.