ऑनलाईन कर्ज घेत असाल तर आधी ‘ही’ बातमी वाचा, नाहीतर होईल मनस्ताप

कर्ज देणाऱ्या या संस्था किंवा अॅप्स कोणतीही शहानिशा न करता अगदी सहज आणि तात्काळ कर्ज देतात. कर्ज घेणाऱ्याकडून मात्र मोठी रक्कम उकळतात.

| Edited By: | Updated on: Mar 15, 2021 | 3:27 PM
1 / 8
कर्ज देणाऱ्या या अॅपच्या माध्यमातून कर्ज घेतल्यानंतर आकरलं जाणारं अव्वाच्या सव्वा व्याज, धमक्या, असभ्य भाषा आणि शिविगाळ यामुळे कर्ज घेणाऱ्याला जिवंतपणीच नरकयातना भोगाव्या लागतात. अशा काही अ‍ॅपच्या फसवेगिरीमुळे, धमकावल्यामुळे लोकांना शिविगाळ केल्यामुळे आतापर्यंत अनेक लोकांनी आत्महत्या केल्या आहेत.

2 / 8
कर्ज मिळवणं सोप्पं, फेडणं अवघड - या अ‍ॅपच्या माध्यमातून कर्ज घेतल्यानंतर जितक्या सहज आणि पटकन कर्ज मिळतं तितक्या सहज ते फेडणं शक्य नसतं. कारण या कंपन्या बँकांपेक्षा कितीतरी पटींनी अधिक व्याज आकारतात. तसेच जीएसटीसह इतर टॅक्सेसची लेबलं लाऊन अधिक पैसे आकारतात.

3 / 8
अशा वेळी लोकांनी अशा अॅप्सची शहानिशा करुनच कर्ज घ्यावं. किंबहुना अशा अॅप्सच्या माध्यमातून कर्ज घेणं टाळायला हवं.

4 / 8
दुप्पट पैशांची आकारणी - जर तुम्ही अॅप्सच्या माध्यमातून कर्ज घेत असाल त्याला अनेक प्रकारचे टॅक्सही जोडले जातात. उदा. जर तुम्ही अॅप्सच्या माध्यमातून 5 हजार रुपयांचां कर्ज घेताय तर त्यावर प्रोसेसिंग फीस 4 हजार रुपये आकारली जाते.

5 / 8
खोट्या नोटीसांची धमकी आणि नातेवाईकांमध्ये नचक्की - कर्जाची परतफेड करण्यास उशीर झाला तर या कंपन्या कर्जदाराच्या मोबाईलवर खोट्या लीगल नोटिसा पाठवतात. तुम्ही कर्ज फेडलं नसल्यामुळे तुमच्याविरोधात कायदेशीर कारवाई करू किंवा करत आहोत आणि त्यासाठी तुम्हाला कोर्टात हजर रहावं लागेल, अशा प्रकारचा आशय या नोटिशींमध्ये लिहिलेला असतो.

6 / 8
या सगळ्या नोटिसा बनावट असतात. कर्जदाराला घाबरवण्यासाठी हे सर्व काही केलेलं असतं. या नोटिसा ते कर्जदारासह त्याच्या नातेवाईकांना, मित्रांना पाठवतात. यातूनच कर्जदाराचे मानसिक खच्चीकरण होते. त्याचदरम्यान अॅपच्या लोकांकडून छळ आणि शिविगाळ सुरुच असते. अशा परिस्थितीत कर्जदार आत्महत्येसारखं गंभीर पाऊल उचलतात.

7 / 8
अ‍ॅप्सच्या माध्यमातून कर्ज घ्यावं का? - रिझर्व्ह बँकेत नोंदणीकृत असणाऱ्या बँका, बँकासह वित्तीय संस्था (non-banking fanancial organizations-NBFO) आणि वेगवेगळ्या राज्यांच्या नियमानुसार कार्यरत असणाऱ्या संस्था, यांनाच कर्जपुरवठा करण्याची अधिकृत परवानगी आहे.

8 / 8
या अॅप्सच्या माध्यमातून कर्ज देणाऱ्या संस्थांचं बँकग्राउंड व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. हे अॅप्स बँकांशी अथवा कोणत्याही वित्तीय संस्थेशी संबंधित नसतील तर त्याद्वारे कर्ज घेऊ नये.