विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड, नागपूरच्या विमानतळावर एमर्जन्सी लँडिंग, 139 प्रवासी सुखरूप

| Updated on: Nov 28, 2021 | 3:34 PM

विमान सुखरूप उतरल्याने सर्व प्रवाशांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. ही घटना शनिवारी सकाळी 11.20 वाजता घडली. या विमानात क्रूमेंबरसह एकूण 139 प्रवासी असल्याची माहिती आहे.

विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड, नागपूरच्या विमानतळावर एमर्जन्सी लँडिंग, 139 प्रवासी सुखरूप
नागपूर विमानतळ
Follow us on

नागपूर : बंगळुरूहून पाटण्याला जाणार्‍या गो फस्टच्या 8873 क्रमांकाच्या विमानाच्या इंजीनमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला. याबद्दलचे संकेत मिळताच वैमानिकानं इंजीन बंद केलं. नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन स्थितीत लँडिंग केले. विमान सुखरूप उतरल्याने सर्व प्रवाशांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. ही घटना शनिवारी सकाळी 11.20 वाजता घडली. या विमानात क्रूमेंबरसह एकूण 139 प्रवासी असल्याची माहिती आहे.

जी-8873 हे विमान बंगळुरू येथून पाटण्याला जात होते. विमानातील इंजीनमध्ये काही तांत्रिक बिघाड निर्माण झाला. विमानातल्या पायलटनं हे विमान नागपूर विमानतळावर उतरविले. त्यांना लगेच इंजीन थांबवण्याचा सिग्नल मिळाला. कॅप्टनने स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी)चे पालन करून नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षित लॅण्डिंगसाठी परवानगी मागितली. या इमरजन्सी लॅण्डिंगची माहिती तातडीने दिली. यानंतर व्यवस्थापन समितीची चमू अलर्ट झाली. तांत्रिक बिघाडाची माहिती मिळताच एटीसीनं नागपूर विमानतळाला याची सूचना दिली. विमानतळ व्यवस्थापनाने सुरक्षित लँडिंगसाठी सर्व प्रकारची व्यवस्था उपलब्ध करून दिली.

दुसऱ्या विमानाने पाटण्याला रवाना

नागपूर विमानतळावर इमर्जन्सी परिस्थितीत उतरलेल्या विमानातील सर्व प्रवाशांना टर्मिनल बिल्डिंगमध्ये आणण्यात आलं. येथील एअरलाईन्सकडून त्यांना जेवण उपलब्ध करून देण्यात आलं. एअरपोर्ट व्यवस्थापन व टर्मिनल्सच्या अधिकाऱ्यांनी त्यांची काळजी घेतली. यामुळं प्रवासी घाबरले किंवा गोंधळले नाही. दुसऱ्या विमानानं प्रवाशांना पाटण्याला रवाना करण्यात आलं.

139 प्रवाशांनी सुटकेचा नि:श्‍वास

चार फायर ब्रिगेडच्या गाड्या, रुग्णवाहिका उपलब्ध होती. याबाबतची माहिती सर्व प्रवाशांना मिळताच त्यांच्यात दहशत निर्माण झाली. मात्र सुरक्षित लँडिंगनंतर सर्व 139 प्रवाशांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. त्यांना दिवसभर नागपुरात ठेवण्यात आले आणि दुपारी 4.45 वाजता दुसर्‍या विमानानं पाटण्याला पाठवण्यात आलं. इंजिनिअरिंग टीम विमानातील बिघाडाचा शोध घेतला.

ऑगस्टमध्ये बांगलादेशच्या विमानाचं लँडिंग

यापूर्वी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पायलटला हृदयविकाराचा झटका आल्यानं बांगलादेश एअरलाईन्सच्या विमानालाही इर्मजन्सी लॅण्डिंग करावी लागली होती. त्यानंतर उपचारादरम्यान पायलटचा मृत्यू झाला. 13 मार्च रोजीही दिल्लीला जाणार्‍या इंडिगोच्या विमानाचं प्रवाशासह नागपुरात आपत्कालीन लँडिंग करावं लागलं होतं.

नागपुरात संविधान दिनी राष्ट्रभक्तीची रांगोळी, विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी उधळले रंग

MLC election सारे काही पर्यटनासाठी, नगरसेवकांना नाही फोन उचलायला वेळ