प्रेमप्रकरणातून जन्मदात्यानेच अपंग मुलीला संपवलं

जालना : जन्मदात्या पित्यानेच गळा आवळून अपंग मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना जालन्यात घडली. जालन्याच्या भोकरदन तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला. मृत तरूणीचे नाव छाया डुकरे असून ती 20 वर्षांची होती. छायाच्या पित्यानेच साडू आणि भाच्याच्या मदतीने तिची निर्घृण हत्या केली. समाधान नामदेव डुकरे (45) असे या आरोपी पित्याचे नाव आहे. प्रेमप्रकणातून हत्या झाल्याचं पोलीस चौकशीत समोर […]

प्रेमप्रकरणातून जन्मदात्यानेच अपंग मुलीला संपवलं
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM

जालना : जन्मदात्या पित्यानेच गळा आवळून अपंग मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना जालन्यात घडली. जालन्याच्या भोकरदन तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला. मृत तरूणीचे नाव छाया डुकरे असून ती 20 वर्षांची होती. छायाच्या पित्यानेच साडू आणि भाच्याच्या मदतीने तिची निर्घृण हत्या केली. समाधान नामदेव डुकरे (45) असे या आरोपी पित्याचे नाव आहे. प्रेमप्रकणातून हत्या झाल्याचं पोलीस चौकशीत समोर आलं.

तरुणीचा मृतदेह वालसंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. मात्र 24 तास उलटूनही छायाचा मृतदेह अद्यापही शवविच्छेदनाविणा आरोग्य केंद्रात पडून आहे.

सोमवारी भोकरदन तालुक्यातील धावडा-मेहगाव रसत्यावर नाल्याच्या काठी छायाचा मृतदेह आढळून आला. यानंतर परिसरात एकच खळबळ माजली. पारध पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि हत्येचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर तीन तासाच्या आतच पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींचा शोध घेतला. पोलिसांच्या तपासात प्रेमप्रकरणावरून पित्यानेच आपल्या मुलीची निर्घृण हत्या केल्याचं निष्पन्न झालं. जम्नदात्या पित्यानेच साडू आणि भाच्याच्या मदतीने गळा आवळून छायाची हत्या केली. त्याआधी तिला मारहाणही करण्यात आली.

याप्रकरणी पारध पोलिसांनी सोमवारी रात्री चार आरोपींना अटक केली. यात मृत छायाचे वडील समाधान नामदेव डुकरे, महादू कचरू उगले, आणा पुंजाजी लोखंडे, रामधन उत्तम दळवी यांचा समावेश आहे.

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.