Flood relief fund : पूरग्रस्त गावांना काय काय मिळणार?

| Updated on: Aug 13, 2019 | 2:33 PM

सांगली आणि कोल्हापूर या पूरग्रस्त जिल्ह्यांना राज्य सरकारने 4700 कोटी रुपयांची आर्थिक मदत (Flood relief fund) देण्याची तरतूद केली आहे.

Flood relief fund :  पूरग्रस्त गावांना काय काय मिळणार?
Follow us on

Flood relief fund मुंबई : सांगली आणि कोल्हापूर या पूरग्रस्त जिल्ह्यांना राज्य सरकारने 4700 कोटी रुपयांची आर्थिक मदत (Flood relief fund) देण्याची तरतूद केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. रोख स्वरुपातील मदतीपासून शेती, मृत जनावरे यांचीही भरपाई देण्यात येणार आहे. राज्य सरकारने दोन जिल्ह्यासाठी 4700 कोटी तर कोकण, नाशिक आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी 2105 कोटी रुपये मान्यता दिली आहे. राज्य सरकार 6800 कोटी रुपयांची मागणी केंद्र सरकारकडे करणार आहे. मात्र तोपर्यंत राज्य सरकार आपल्या तिजोरीतून आपत्कालिन तरतूद म्हणून ही भरपाई देणार आहे.

पडलेली घरं पुन्हा बांधून देण्याचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं. पूर्ण नवीन घरं, घरांची दुरुस्ती किंवा पूर्ण घर शिफ्ट करण्यासाठी 222 कोटी रुपये देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत पोर्टल उघडून मदत केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

सविस्तर बातमी –  पडलेली घरं पुन्हा बांधणार, पूरग्रस्त भागासाठी 6800 कोटींची केंद्राकडे मागणी

पूरग्रस्त गावांना काय काय मिळणार?

  1. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी 4700 कोटी रुपयांची मदत
  2. कोकण, नाशिक आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी 2105 कोटी रुपये मान्यता
  3. पोलीस पाटील आणि सरपंच यांनी जरी पंचनामा दिला तरी तो ग्राह्य धरला जाईल
  4. पूरग्रस्तांना शहरात 15 हजार, ग्रामीण भागात 10 हजार रुपये थेट देणार
  5. ग्रामीण भागात 10 हजाराव्यतिरिक्त जमिनीचे पैसे,  मृत जनावरांची नुकसान भरपाई आणि पिकाचे पैसे देणार
  6. शहरी भागात 15 हजार व्यतिरिक्त इतर मदत थेट स्वरुपात नाही
  7. घरांसाठी – पूर्ण नवीन घर बांधणे, दुरुस्ती करणे, पूर्ण घर शिफ्ट करणे यासाठी 222 कोटी
  8. प्रधानमंत्री आवास योजनेचे पोर्टल उघडून यातून मदत केली जाणार
  9. कचरा साफ करण्यासाठी – 66 कोटी
  10. दगावलेल्या जनावरांसाठी – 30 कोटी
  11. पिकांच्या नुकसानीसाठी, ऊस पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे –
  12. मत्स्य व्यवसायासाठी – 11 कोटी
  13. सार्वजनिक विभाग, नगरपालिका, महापालिका यांचे रस्ते दुरुस्तीसाठी – 876 कोटी
  14. जलसंपदा आणि जलसंधारण – 168 कोटी
  15. छोटे व्यावसायिक नुकसानीच्या 50 टक्के आणि जास्तीत जास्त 50 हजार रुपये मदत करणार – त्यासाठी 300 कोटी
  16. केंद्राकडे 6800 कोटी रुपयांची मागणी करणार

Maharashtra Flood | कोल्हापूर-सांगलीत पूर ओसरण्यास सुरुवात 

पूरग्रस्त कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील (Sangli Kolhapur Flood) पाणी हळूहळू ओसरु लागलं आहे. मात्र अनेक भागात अजूनही कमरेपर्यंत पाणी आहे. आठवड्यापेक्षा जास्त काळ पाणी तुंबल्याने घरांसह शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सुदैवाने दोन दिवस पावसाने विश्रांती दिल्याने कोल्हापूर आणि कृष्णा नदीची पाणी पातळी उतरली आहे.

संबंधित बातम्या

पडलेली घरं पुन्हा बांधणार, पूरग्रस्त भागासाठी 6800 कोटींची केंद्राकडे मागणी 

Maharashtra Flood | कोल्हापूर-सांगलीत पूर ओसरण्यास सुरुवात