PSI पतीच्या बंदुकीतून गोळीबार, पोलीस पत्नीची आत्महत्या

| Updated on: May 07, 2020 | 8:24 PM

मूलचेरा येथील पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या धनराज शिरसाठ यांच्या पत्नीने त्यांच्याच बंदूकीतून स्वत:वर गोळ्या झाडून घेतल्या.

PSI पतीच्या बंदुकीतून गोळीबार, पोलीस पत्नीची आत्महत्या
Follow us on

गडचिरोली : गडचिरोतील एका पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीने (PSI Wife Commit Suicide) स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. मूलचेरा येथील पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या धनराज शिरसाठ यांच्या पत्नीने त्यांच्याच बंदूकीतून स्वत:वर गोळ्या झाडून घेतल्या आहेत. संगिता शिरसाठ ( वय 30) असं आत्महत्या केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीचं नाव आहे. मुलचेरा पोलीस वसाहतीत (PSI Wife Commit Suicide) ही धक्कादायक घटना घडली.

मूळचे जळगाव येथील रहिवासी असलेले धनराज शिरसाठ हे मूलचेरा येथे वर्षभरापासून पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते पत्नी संगिता, दोन मुलं आणि आई-वडिलांसह मुलचेरा येथील पोलीस वसाहतीत वास्तव्यास आहेत.

धनराज शिरसाठ हे आज (7 मे) नक्षलविरोधी अभियान राबवून घरी परतले. त्यानंतर ते आपल्या आई-वडिलांना घेऊन काही कामानिमित्त घराबाहेर पडले. त्यावेळी पत्नी संगिता ही आपल्या दोन मुलांसह घरी होती. दरम्यान, संगिताने पतीच्या बंदुकीतून स्वतःवर गोळ्या झाडल्या. आईला स्वत:वर गोळ्या घातल्याचं पाहून मुलांनी आरडाओरड केली (PSI Wife Commit Suicide). त्यांचा आवाज ऐकून परिसरातील पोलिसांनी शिरसाठ यांच्या घराकडे धाव घेतली. तिथे त्यांना संगिता या रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसून आलं.

पोलिसांनी लगेच संगिताला चंद्रपूरला उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. संगिताने आत्महत्या का केलं याचं कारण अज्ञाप समजू शकलेलं नाही. मुलचेरा पोलीस घटनेचा अधिक (PSI Wife Commit Suicide) तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या :

Lockdown | जालन्यात अवैध दारुवर धडक कारवाई, विदेशी दारुचा मोठा साठा जप्त

पोलीस व्हॅनमध्ये TikTok व्हिडीओ करणं भोवलं, कल्याणमध्ये दोघांवर कारवाई

चंद्रपुरात भाजप नेत्याच्या घरी थरार, वडिलांचा दोन मुलांवर गोळीबार, स्वत:वरही गोळी झाडली

नागपुरात घरगुती वादातून मुलाकडून पित्याची हत्या