चंद्रपुरात भाजप नेत्याच्या घरी थरार, वडिलांचा दोन मुलांवर गोळीबार, स्वत:वरही गोळी झाडली

चंद्रपुरात वडिलांनी दोन मुलांवर गोळीबार करुन स्वत: आत्महत्या केल्याची घटना घडली. या गोळीबारात एका मुलाचा मृत्यू झाला आहे

चंद्रपुरात भाजप नेत्याच्या घरी थरार, वडिलांचा दोन मुलांवर गोळीबार, स्वत:वरही गोळी झाडली

चंद्रपूर : चंद्रपुरात वडिलांनी दोन मुलांवर गोळीबार करुन स्वत: (Chandrapur Father Shot Two Sons) आत्महत्या केल्याची थरारक घटना घडली. या गोळीबारात एका मुलाचा मृत्यू झाला आहे, तर दुसऱ्या मुलावर सध्या नागपुरात उपचार सुरु आहेत. चंद्रपुरातील बल्लापूरमध्ये ही थरारक घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे एका भाजप नेत्याच्या (Chandrapur Father Shot Two Sons) घरी ही घटना घडली.

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातील भगतसिंग वॉर्डात हे हत्याकांड झाले. भाजपच्या ज्येष्ठ नेत्याच्या घरी हा गोळीबार झाल्याची माहिती आहे. या नेत्याच्या भावाने घरगुती भांडणातून स्वतःच्या दोन मुलांवर रिव्हॉल्व्हरने गोळ्या झाडल्या. त्यानंतर या व्यक्तीने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली.

आपल्याच मुलांवर गोळ्या झाडणाऱ्या या वडिलांचे नाव मूलचंद द्विवेदी आहे. तर, आकाश (वय 22) आणि पवन (वय 15) असं त्यांच्या मुलांची नावं आहेत. या गोळीबारानंतर आकाशचा रुग्णालयात नेताना रस्त्यातच मृत्यू झाला. तर पवनला अत्यवस्थस्थितीत चंद्रपूरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं (Chandrapur Father Shot Two Sons). त्यानंतर त्याच्यावर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नागपूरला रवाना करण्यात आलं. सध्या त्याच्यावर नागपुरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या गोळीबार आणि आत्महत्येमागील नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मृत वडील मूलचंद द्विवेदी एका रोकड वाहतुक करणाऱ्या कंपनीत गार्ड असल्याची माहिती आहे. हे कुटुंब भाजप नेते शिवचंद द्विवेदी यांच्या घरी वरच्या माळ्यावर वास्तव्याला होते (Chandrapur Father Shot Two Sons).

संबंधित बातम्या :

राहत्या इमारतीच्या बाराव्या मजल्यावरुन उडी, पिंपरी चिंचवडमध्ये आयटी अभियंत्याची आत्महत्या

सांगलीत सलग दुसऱ्या दिवशी लैंगिक अत्याचाराची घटना, सहावीतील मुलीवर जबरदस्ती, मोबाईलवर अश्लील फोटो काढले

राहत्या इमारतीच्या बाराव्या मजल्यावरुन उडी, पिंपरी चिंचवडमध्ये आयटी अभियंत्याची आत्महत्या

मुंबईत लॉकडाऊनमध्ये भर रस्त्यात गोळीबार, दोघांना अटक

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *