AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलीस व्हॅनमध्ये TikTok व्हिडीओ करणं भोवलं, कल्याणमध्ये दोघांवर कारवाई

कल्याणमध्ये एका तरुणाने लॉकडाऊनचं उल्लंघन करत चक्क पोलीस व्हॅनमध्ये TikTok व्हिडीओ बनवला. याप्रकरणी दोघांवर कारवाई (TikTok Video In Police Van) करण्यात आली आहे.

पोलीस व्हॅनमध्ये TikTok व्हिडीओ करणं भोवलं, कल्याणमध्ये दोघांवर कारवाई
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Apr 29, 2020 | 9:47 PM
Share

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून देशात (TikTok Video In Police Van) लॉकडाऊन घोषित करण्यात आला. लॉकडाऊनचं काटेकोरपणे पालन व्हावं म्हणून पोलीस या कठीण प्रसंगातही आपला जीव धोक्यात टाकून कर्तव्य बजावत आहेत. मात्र, काही जणांना लॉकडाऊनचं गांभीर्य अद्यापही कळलेलं नाही. कल्याणमध्ये एका तरुणाने लॉकडाऊनचं उल्लंघन करत चक्क पोलीस व्हॅनमध्ये TikTok व्हिडीओ बनवला. याप्रकरणी दोघांवर कारवाई (TikTok Video In Police Van) करण्यात आली आहे.

कल्याण-डोंबिवली कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. शहरात 28 ठिकाणं अशी आहेत, ज्या ठिकाणी नाकाबंदी केलेली आहे. येथे पोलीस रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत. त्यांचं कर्तव्य बजावत आहेत. मात्र, येथील वालधूनी परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला. येथे पोलीस रस्त्यावर नाकाबंदीमध्ये व्यस्त असताना एका तरुणाने पोलीस व्हॅनमध्ये TikTok व्हिडीओ बनवला (TikTok Video In Police Van).

रोहित डांगे असं या तरुणाचं नाव आहे. पोलिसांचं लक्ष नसताना रोहित पोलीस व्हॅनमध्ये शिरला आणि खाली उतरला. त्याचा त्याने टिकटॉक व्हिडीओ तयार केला. हा व्हिडीओ तयार करण्यासाठी त्याला एका अल्पवयीन मुलीने त्याला साथ दिली. हा TikTok व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी दोघांविरोधात कारवाई केली आहे (TikTok Video In Police Van).

संबंधित बातम्या :

चंद्रपुरात भाजप नेत्याच्या घरी थरार, वडिलांचा दोन मुलांवर गोळीबार, स्वत:वरही गोळी झाडली

राहत्या इमारतीच्या बाराव्या मजल्यावरुन उडी, पिंपरी चिंचवडमध्ये आयटी अभियंत्याची आत्महत्या

नागपुरात घरगुती वादातून मुलाकडून पित्याची हत्या

वर्ध्यात भांडण सोडवायला गेलेल्या पोलीस शिपायाला जबर मारहाण, माजी आमदारासह दोन पुत्रांवर गुन्हा

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...