वर्ध्यात भांडण सोडवायला गेलेल्या पोलीस शिपायाला जबर मारहाण, माजी आमदारासह दोन पुत्रांवर गुन्हा

भांडण सोडवायला गेलेल्या पोलीस शिपायाला मारहाण करण्यात आल्याची घटना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे घडली.

वर्ध्यात भांडण सोडवायला गेलेल्या पोलीस शिपायाला जबर मारहाण, माजी आमदारासह दोन पुत्रांवर गुन्हा
Follow us
| Updated on: Apr 25, 2020 | 9:59 AM

वर्धा : भांडण सोडवायला गेलेल्या पोलीस शिपायाला (Former MLA Beats Police) मारहाण करण्यात आल्याची घटना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे घडली. धक्कादायक म्हणजे ही मारहाण माजी आमदार आणि त्यांच्या दोन पुत्रांकडून करण्यात आली. याप्रकरणी माजी आमदार आणि आमदार पुत्रांवर गुन्हा (Former MLA Beats Police) दाखल करण्यात आला आहे.

पोलीस शिपाई महेंद्र गायकवाड (वय 45) हे हिंगणघाट तालुक्यातील अल्लिपूर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. पोलीस शिपाई महेंद्र गायकवाड हे साप्ताहिक रजेवर असताना त्यांच्या मूळ गावी हिंगणघाटला आले होते. ते भाजीपाला घेण्यासाठी घराबाहेर पडले. त्यानंतर ते एका दुकानात ब्रेड घेण्यासाठी गेले. त्या दुकानाशेजारी माजी आमदार राजू तिमांडे यांचं घर होतं. राजू तिमांडे यांच्या घरासमोर काही लोकांची गर्दी जमली होती आणि राजू तिमांडे यांची दोन मुलं आणि पाच जण मिळून एकाला मारहाण करत होते.

हे पाहून पोलीस शिपाई महेंद्र गायकवाड त्या व्यक्तीच्या मदतीसाठी धावून गेले. मात्र, महेंद्र गायकवाड यांना अरेरावी करत माजी आमदार राजू तिमांडे यांनी त्यांची कॉलर पकडली. त्यानंतर माजी आमदाराच्या मुलांनी महेंद्र गायकवाड यांना जबर मारहाण केली. बोटातील लोखंडी फायटरने महेंद्र गायकवाड यांच्या डोक्यावर वार करण्यात (Former MLA Beats Police) आले. या मारहाणीत त्यांच्या डोक्याला, छातीवर, उजव्या हातावर, तोंडावर आणि पायावर दुखापत झाली आहे.

या प्रकरणी माजी आमदार राजू तिमांडे, त्यांचे पुत्र नगरसेवक सौरभ तिमांडे आणि गौरव तिमांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या तिघांनाही अटक केली. मात्र, तिमांडे यांना शुक्रवारी दुपारी चार वाजता न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. तर त्यांची दोन्ही मुले पोलिसांच्या ताब्यात असून त्यांना आज न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती हिंगणघाटचे उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे यांनी दिली.

तक्रारकर्ते महेंद्र गायकवाड यांना वैद्यकीय तपासणीकरिता सेवाग्राम रुग्णालयात पाठवण्यात (Former MLA Beats Police) आलं आहे.

संबंधित बातम्या :

अत्यावश्यक सेवेचा गैरवापर करत मुंबई ते सांगली प्रवास, तरुणीला कोरोनाची लागण, पाच जणांवर गुन्हे

सांगलीत सलग दुसऱ्या दिवशी लैंगिक अत्याचाराची घटना, सहावीतील मुलीवर जबरदस्ती, मोबाईलवर अश्लील फोटो काढले

कोल्हापूरच्या 19 वर्षीय तरुणीवर मिरजेत सामूहिक बलात्कार

मुंबईत लॉकडाऊनमध्ये भर रस्त्यात गोळीबार, दोघांना अटक

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.