रिक्षाचालक संशयास्पदरीत्या फिरताना आढळला; चौकशी केली असता आढळले 56 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने

| Updated on: Nov 17, 2020 | 5:09 PM

संशयास्पदरीत्या फिरत असलेल्या रिक्षाचालकाकडे तब्बल 1 किलो 368 ग्रॅम सोन्याचे दागिने सापडले आहेत. या दागिन्यांचे बाजारमूल्य तब्बल 56 लाख 89 हजार रुपये आहे.

रिक्षाचालक संशयास्पदरीत्या फिरताना आढळला; चौकशी केली असता आढळले 56 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने
Follow us on

अहमदनगर : संशयास्पदरीत्या फिरत असलेल्या रिक्षाचालकाकडे तब्बल 1 किलो 368 ग्रॅम सोन्याचे दागिने सापडले आहेत. या दागिन्यांचे बाजारमूल्य तब्बल 56 लाख 89 हजार रुपये आहे. पांढऱ्या रिक्षात संशयास्पदरीत्या फिरताना आढळल्यामुळे शहरातील कोतवाली पोलिसांनी त्याची चौकशी केली. त्यानंर त्याच्याकडे 56 लाखांचे सोन्याचे दागिने सापडल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. फैरोज रफीक पठाण असे रिक्षाचालकाचे नाव आहे. (gold jewelry of 56 lakh rupees found, auto rickshaw driver arrested)

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे एका पांढऱ्या रंगाची रिक्षा कोतवाली पोलीस ठाण्याच्या परिसरात संशयास्पदरित्या फिरताना आढळली. कोतवाली पोलिसांना संशय आल्यानंतर त्यांनी या रिक्षाचालकाकडे चौकशी केली. दरम्यान, पोलीस विचारपूस करत असतानाच रिक्षाचालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर संशय बळावल्याने पोलिसांनी त्याला दोन पंचासमक्ष त्याचे नाव, गाव विचारले. चौकशीतून त्याचे नाव फैरोज रफीक पठाण असून तो मूळचा अहमदनगरचाच असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, पोलिसांनी त्याची आणि रिक्षाची झाडाझडती घेतली. रिक्षामध्ये पोलिसांना तब्बल 1 किलो 368 ग्रॅम किमतीचे सोन्याचे दागिने आढळले. या दागिन्यांची किंमत तब्बल 56 लाख 89 हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या दागिन्यांविषयी विचारले असता रिक्षाचालकाने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने तसेच, दागिन्यांची कागदपत्रे न दाखवल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. प्रकरणाचा तपास कोतवाली पोलीस करत आहेत. (gold jewelry of 56 lakh rupees found, auto rickshaw driver arrested)

संबंधित बातम्या :

ड्रग्ज पेडलर्ससह चौघांना अटक, साडे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त, नागपूर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

पोलीस असल्याची बतावणी करून प्रवाशांची लूट; 55 हजारांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक

बारामती पोलिसांची दमदार कामगिरी, विविध गुन्ह्यातील सराईत आरोपींना अटक, 14 लाखांचा मुद्देमाल जप्त