VIDEO : गोविंदाच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल, शेकडो चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

गोविंदा डान्स करत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे (Govinda dancing in Cred Club Ad).

VIDEO : गोविंदाच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल, शेकडो चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदाचे देशासह जगभरात लाखो चाहते आहेत. गोविंदाच्या आगामी चित्रपटाचे चाहते खूप आतुरतेने वाट पाहत असतात. यावेळीदेखील गोविंदा चर्चेत येण्यामागे तसंच काहीसं कारण आहे. गोविंदा डान्स करत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे (Govinda dancing in Cred Club Ad).

गोविंदाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटदेखील हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ क्रेड क्लबच्या जाहिरातीचा आहे. या जाहिरातीत गोविंदा ऑडिशन देत असल्याचं दिसत आहे. या जाहिरातीत गोविंदा डान्स करताना दिसत आहे. जाहिरातीत गोविंदाचा डान्स पाहून चाहते प्रचंड खूश झाले आहेत. त्यांनी गोविंदाच्या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत (Govinda dancing in Cred Club Ad).

“गोविंदा खरंच खूप चांगले अभिनेता आहेत. ते कोणतीही भूमिका सहज करतात. ते आपल्या चांगल्या अभिनय कौशल्याने कोट्यवधी लोकांचे मनं जिंकतात”, अशी प्रतिक्रिया गोविंदाच्या एका चाहत्याने ट्विटरवर दिली आहे.

“गोविंदा तू बॉलिवूडमधील महान कलाकारांपैकी एक आहेस. या कलाकाराने आपल्या विनोदाच्या अचूक वेळी आपलं कौशल्य दाखवत शेकडो चेहऱ्यांवर हसू आणलं आहे”, अशी प्रतिक्रिया दुसऱ्या एका चाहत्याने ट्विटरवर दिली.

हेही वाचा : Karan Johar | गोव्यात या, पण स्वतःचा कचरा सोबत न्या, गोव्याच्या मंत्र्यांचा करण जोहरला सज्जड दम!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI