शाळेच्या सहलीची बस 200 फूट दरीत कोसळली, दहा विद्यार्थ्यांचा मृत्यू

| Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM

अहमदाबाद : गुजरातमध्ये शाळेच्या मुलांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे. बस 200 फूट दरीत कोसळली असून या अपघातात दहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय तर 40 विद्यार्थी गंभीर जखमी आहेत. ही धक्कदायक घटना गुजरातमधील डांग जिल्ह्यातील बर्डीपाडाजवळ घडली. बसमध्ये एकूण 85 जण होते त्यात 75 विद्यार्थी, 10 शिक्षक आणि पालकही या बसमध्ये होते. जखमी विद्यार्थ्यांवर […]

शाळेच्या सहलीची बस 200 फूट दरीत कोसळली, दहा विद्यार्थ्यांचा मृत्यू
Follow us on

अहमदाबाद : गुजरातमध्ये शाळेच्या मुलांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे. बस 200 फूट दरीत कोसळली असून या अपघातात दहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय तर 40 विद्यार्थी गंभीर जखमी आहेत. ही धक्कदायक घटना गुजरातमधील डांग जिल्ह्यातील बर्डीपाडाजवळ घडली. बसमध्ये एकूण 85 जण होते त्यात 75 विद्यार्थी, 10 शिक्षक आणि पालकही या बसमध्ये होते. जखमी विद्यार्थ्यांवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मुलांना पिकनिकसाठी डांग येथील ऐतिहासिक जागा दाखवण्यासाठी घेऊन गेले होते. सर्व विद्यार्थी सुरतमधील अमरेली येथील खासगी ट्यूशनमध्ये शिक्षण घेते होते. ही घटना शनिवारी संध्याकाळी 7 वाजता घडली असल्याचे सांगितलं जात आहे. बस दरीत कोसळल्यावर स्थानिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली आणि रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात केली.

जखमी विद्यार्थ्यांना डांग येथील रुग्णालयात दाखल केले आहे. यामध्ये 20 विद्यार्थ्यांची परिस्थिती नाजूक असल्याचे बोललं जात आहे. परिस्थिती नाजूक असल्यामुळे नऊ मुलांना सुरत येथे हलवण्यात आलं आहे. प्रशासनातर्फे जखमी मुलांवर मोफत उपचार करणार असल्याचे सांगितलं आहे.

बसमध्ये पहिली ते सातवीच्या वर्गातले विद्यार्थी होते. यासोबतच विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालक आणि शिक्षकही होते. पिकनिकसाठी या मुलांचा अभ्यासदौरा आयोजित करण्यात आला होता. संध्याकाळी परतत असताना हा भीषण अपघात झाला आहे.