हैदराबादेत तुफान पाऊस, आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू, रस्ते जलमय, अनेक गाड्या तरंगल्या

| Updated on: Oct 14, 2020 | 3:30 PM

आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकसह ओदिशात धुवांधार पाऊस बरसत आहे. तुफान पावसाने हैदारबादमध्ये आतापर्यंत 12 जणांचा बळी घेतला आहे. (Heavy rain in Andhra Pradesh, Telangana,karnataka, odisha, 12 died in hyderabad)

हैदराबादेत तुफान पाऊस, आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू, रस्ते जलमय, अनेक गाड्या तरंगल्या
Follow us on

हैदराबाद : मुसळधार पावसाने दक्षिण भारतात थैमान घातलं आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकसह ओदिशात धुवांधार पाऊस बरसत आहे. तुफान पावसाने हैदारबादमध्ये आतापर्यंत 12 जणांचा बळी घेतला आहे. हैदराबादमध्ये अनेक भागात रस्त्यावर कमरे इतकं पाणी साचल्याने, परिसराला नदीचं स्वरुप आलं. जोरदार पावसाने हैदराबादमध्ये अनेक पडझडीच्या घटना घडल्या. घराबाहेर पडलेले नागरिक अडकून पडले. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी बचाव पथकं तैनात करण्यात आली. जीएचएमसी आणि डीआरएफच्या टीम मदतीसाठी मैदानात उतरल्या आहेत. आणि बोटींमध्ये सुरक्षित ठिकाणी नागरिकांना पोहोचवले जात आहे. (Heavy rain in Andhra Pradesh, Telangana, karnataka, odisha, 12 died in hyderabad)

अतिवृष्टीने घराची पडझड, 9 जणांचा मृत्यू

तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये अतिवृष्टीमुळे एक घर कोसळले. या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला, तर 2 जण जखमी आहेत. याशिवाय मुसळधार पावसामुळे अन्यत्र तिघांचा मृत्यू झाला. त्यामुळे हैदराबादमधील मृतांचा आकडा 12 वर पोहोचला आहे. (Heavy rain in Andhra Pradesh, Telangana,karnataka, odisha, 12 died in hyderabad)

या घटनेनंतर हैदराबादचे एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसींनी घटनास्थळी जाऊन आढावा घेतला. ओवेसींच्या म्हणण्यानुसार, “हैद्राबाद शहरातील जुन्या भागात बुंदलागुडा मोहम्मदिया हिल्समध्ये मुसळधार पावसामुळे भिंत कोसळली. यामुळे घरामध्ये मोठे दगड पडले. ज्यामुळे 9 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे”.

अनेक घरात पाणी साचले
गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील पोलावरम पेद्दा काळूवा कालव्याच्या काठावर अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 16 वर पुराचे पाणी आले आहे. अनेक गावे जलमय झाली आहेत, अनेक घरे पडली आहेत.

मारुती सर्व्हिस सेंटरच्या अनेक गाड्या पाण्यात बुडाल्या
हैदराबादमधील करमनघाट भागात मुसळधार पावसामुळे पाणी साचले आहे. त्यामुळे मारुती सर्व्हिस सेंटरच्या अनेक गाड्या पाण्यात बुडाल्या. त्याचबरोबर हैदराबादच्या हिमायत सागर तलावात पाण्याची पातळी वाढल्यामुळे 17 पैकी 10 दरवाजे उघडण्यात आले आहेत.

 

उपराष्ट्रपतींकडून चिंता व्यक्त
उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि ओडिशामध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “पीडित कुटुंबांबद्दल सहानुभूती आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनाचे पालन करावे”

(Heavy rain in Andhra Pradesh, Telangana, karnataka, odisha, 12 died in hyderabad)