बाईकवर फॅन्सी नंबर प्लेट, पुणे पोलिसांचं भन्नाट ट्वीट

| Updated on: Jan 08, 2020 | 9:53 AM

पुणे पोलिसांनी नवीन वर्षात जणू विनोदाचे सर्व रेकॉर्ड मोडण्याचा संकल्प केला आहे.

बाईकवर फॅन्सी नंबर प्लेट, पुणे पोलिसांचं भन्नाट ट्वीट
Follow us on

पुणे : पुणे पोलीस सध्या ट्वीटरवर ट्रेंडिंगमध्ये आहे. पुणे पोलिसांच्या जबरदस्त ट्वीट्समुळे सोशल मीडियावर पुणे पोलीस सध्या चर्चेत आहे (Pune Police Tweet). शिवाय, पुणे पोलिसांची ट्वीटरवर फॉलोईंगही वाढत चालली आहे. पुणे पोलिसांनी नवीन वर्षात जणू विनोदाचे सर्व रेकॉर्ड मोडण्याचा संकल्प केला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नशा न करु नका, असं सागणारं पुणे पोलिसांचं ट्वीट व्हायरल झालं होतं. त्यामध्ये पुणे पोलिसांच्या क्रिएटीव्हीटीचं अनेकांनी कौतुक केलं होतं. आता पुणे पोलीस पुन्हा एकदा चर्चेत आहेत. त्याचं कारण म्हणजे, पुणे पोलिसांचं नवं ट्वीट (Pune Police Tweet).

पुणे पोलिसांना टॅग करत एका व्यक्तीने स्कूटर चालकाचा फोटो पोस्ट केला. या स्कूटरवर जी नंबर प्लेट लागली होती, त्यावर एक छोटासा क्राऊन म्हणजेच मुकूट बनलेलं होतं. यानंतर पुणे पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हा फोटो रिट्वीट केला आणि लिहिले, ‘दुर्दैवाने राजा साहेबांना लवकरच चालानने पुरस्कृत केलं जाईल’.

पुणे पोलिसांच्या या मजेशीर ट्वीटवर अनेकांना प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी पुणे पोलिसांचं कौतुक केलं. याआधीही पुणे पोलिसांनी अशा प्रकारे आपल्या जबरदस्त ट्वीटमुळे लोकांनी मनं जिंकली. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पुणे पोलिसांचं एक ट्वीट मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं. पुणे पोलिसांना टॅग करत अप्रतिम नावाच्या ट्विटर हँडलवरुन एक ट्वीट करण्यात आलं. ‘ जर मी तुम्हा लोकांना अड्डा सांगितला, तर 10 पुड्या माझ्या? चालेल ना सर?’ यावर पुणे पोलिसांनी मजेशीर उत्तर दिलं. अप्रतिमच्या या ट्वीटवर पुणे पोलिसांनी रिट्वीट केलं. ‘तुम्ही सर्व पुड्या ठेवून घ्या, आम्ही फक्त तुम्हाला ठेवून घेऊ. चालेल ना सर?’. पुणे पोलिसांचं हे ट्वीट मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं.

वाहतुकिच्या नियमांचं उल्लंघन

मोटार वाहन कायदा 50 आणि 51 नुसार गाडीच्या नंबर प्लेटवर फॅन्सी फॉन्ट, नाव किंवा फोटो लावणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या गाड्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जाते.