व्हॅलेनटाईन डे निमित्त अनोखी ऑफर, हॉटेलमध्ये गरोदर राहिल्यास 18 वर्ष मोफत स्टे

व्हॅलेनटाईन डे निमित्ताने अनेक प्रेमी युगुल या दिवसाची तयारी करत (Hotel Zed Give Different offer for couple this valentines day) असतात.

व्हॅलेनटाईन डे निमित्त अनोखी ऑफर, हॉटेलमध्ये गरोदर राहिल्यास 18 वर्ष मोफत स्टे
| Edited By: | Updated on: Feb 05, 2020 | 2:58 PM

ओटावा (कॅनडा) : व्हॅलेनटाईन डे निमित्ताने अनेक प्रेमी युगुल या दिवसाची तयारी करत (Hotel Zed Give Different offer for couple this valentines day) असतात. याच व्हॅलेनटाईन डेला कॅनडामधील एका हॉटेलने प्रेमी युगुलांसाठी एक अनोखी ऑफर दिली आहे. व्हॅलेनटाईन डेला जर तुम्ही हॉटेलमध्ये स्टे केला आणि या दरम्यान गरोदर राहिला तर पुढील 18 वर्षांसाठी येथे हॉटेल स्टे मोफत मिळेल. कॅनडामधील ‘हॉटेल झेड’ने ही ऑफर प्रेमी युगुलांना दिली  (Hotel Zed Give Different offer for couple this valentines day)आहेत.

हॉटेल झेड हे व्हिक्टोरिया आणि किलोन येथे आहेत. हॉटेलने या ऑफरचा एक प्रोमोही तयार केला आहे. प्रोमोमध्ये म्हटलं आहे की, हॉटेलमध्ये प्रेमी युगुल राहणार त्या दरम्यान जर गरोदर राहिली, तर पुढील 18 वर्ष त्या प्रेमी युगुलांकडून हॉटेलमध्ये राहण्यासाठी कोणतेही पैसे आकारले जाणार नाहीत. हॉटेल झेडच्या या अनोख्या ऑफरमुळे सर्वत्र त्यांची चर्चा सुरु आहे.

“जर एखाद्या प्रेमी युगुलाला बाळ हवं असल्यास ते आमच्या हॉटेलमध्ये येऊन या ऑफरचा फायदा मिळवू शकता. जर तुम्ही हॉटेलमध्ये राहत असताना गरोदर राहिल्यास 18 वर्ष मोफत स्टे तुम्हाला मिळू शकते”, असं हॉटेलचे सीईओ मँड फार्मर यांनी सांगितले.

दरम्यान, या हॉटेलमध्ये राहत असताना गरोदर शिवाय सरोगसी पद्धत किंवा मूल दत्तक घेऊनही तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊ शकता, असं हॉटेलकडून सांगण्यात आलं आहे.