थरारक व्हिडीओ, उंच उडीमुळे बिबट्याचा जीव वाचला

सोशल मीडियावर सध्या एका बिबट्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक तरस बिबट्यावर हल्ला करताना (Hyena attack on leopard) दिसत आहे.

थरारक व्हिडीओ, उंच उडीमुळे बिबट्याचा जीव वाचला
| Edited By: | Updated on: Oct 20, 2019 | 6:46 PM

मुंबई : सोशल मीडियावर सध्या एका बिबट्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरस बिबट्यावर हल्ला करताना (Hyena attack on leopard) दिसत आहे. यावेळी बिबट्याने उंच उडी घेतल्यामुळे त्याचा जीव वाचला. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस (IFS) सुसांता नंदा यांनी हा थरारक व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तरस आणि बिबट्यामध्ये भांडण सुरु आहे. यामध्ये तरसने थेट बिबट्यावर हल्ला (Hyena attack on leopard) चढवला. मात्र, त्याचवेळी बिबट्याने उंच उडी घेतली आणि तो झाडावर चढला. त्यामुळे त्याचा जीव वाचला.

जीवन आणि मृत्यूच्यामधले अंतर कधी-कधी एका उंचीचे असते, असं कॅप्शन सुसांता नंदा यांनी या व्हिडीओला दिले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ 18 ऑक्टोबरला पोस्ट करण्यात आला. सध्या या व्हिडीओला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत पाच हजारपेक्षा अधिक लोकांनी पाहिलं आहे. तर 500 लोकांनी व्हिडीओला लाईक केले आहे.

जंगलातील प्राण्यांचे व्हिडीओ लोकांना आवडतात. लोकांमध्ये जंगली प्राण्यांच्या शिकारी, राहणे ते काय खातात, कसे राहतात हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते. त्यामुळे हा व्हिडीओ लोकांच्या पसंतीस पडत आहे.