मला अनेक राजकीय पक्षांकडून ऑफर : विक्रम गोखले

| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

पुणे: लोकसभा निवडणुकीत पुलवामा हल्ल्यावरुन आरोपप्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनीही याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे. “पुलवामा हल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतं मागणे चुकीचं आहे. हल्ल्याचा राजकीय वापर करु नये, चूक होईल”, असं विक्रम गोखले म्हणाले. पुलवामा संदर्भातील भाषणाचा मतासाठी उपयोग करु नये, असं आवाहन त्यांनी केलं. तसंच […]

मला अनेक राजकीय पक्षांकडून ऑफर : विक्रम गोखले
Follow us on

पुणे: लोकसभा निवडणुकीत पुलवामा हल्ल्यावरुन आरोपप्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनीही याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे. “पुलवामा हल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतं मागणे चुकीचं आहे. हल्ल्याचा राजकीय वापर करु नये, चूक होईल”, असं विक्रम गोखले म्हणाले. पुलवामा संदर्भातील भाषणाचा मतासाठी उपयोग करु नये, असं आवाहन त्यांनी केलं. तसंच मला अनेक राजकीय पक्षांचं बोलावणे आहे, मात्र मी कोणत्याही राजकीय पक्षाला बांधील नाही, असं त्यांनी ठणकावून सांगितलं.

पुण्यात ते  विक्रम गोखले अॅक्टिंग अकादमीच्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना गोखले यांनी राजकारण, आत्मचरित्रासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

यावेळी बोलताना गोखले यांनी “राजकारणसाठी प्रशिक्षण हवं. अमिताभ बच्चन यांनाही याबाबत पश्चाताप झाला आहे. मलाही अनेक राजकीय पक्षांनी बोलवलं मात्र मी कोणत्याही राजकीय पक्षाला बांधील नाही. राजकारण व्यवसाय, धंदा झाला आहे”, असं नमूद केलं.

तरुण मुलांनी एखाद्या राजकीय पुढाऱ्याच्या पाठीमागे लागू नये. राजकारणात यायचे असेल तर अभ्यास हवा. संविधान माहीत नाही असे तरुण नेत्यांच्या मागे फिरतात, मात्र त्यांनी हे लक्षात ठेवावं, हे तरुण लाठ्या काठ्या खातात आणि यांचे नेते घरी राहतात असं विक्रम गोखले म्हणाले.

मी आत्मचरीत्र लिहणार नाही. सर्व आत्मचरीत्रे खोटी असतात. आत्मचरीत्र लिहणारा अलिप्त आणि त्रयस्थपणा हवा आहे, मात्र मी एवढा मोठा नाही असं विक्रम गोखले यांनी सांगितलं.