CWG 2022: टेबल टेनिसमध्ये भारताने जिंकले आणखी एक गोल्ड मेडल, मेन्स टीम इव्हेन्टमध्ये सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन

| Updated on: Aug 02, 2022 | 9:21 PM

भारताने २०१८च्या गोल्ड कोस्टमध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये या इव्हेंटमध्ये दुसऱ्यांदा गोल्ड मिळवले होते. आता तिसऱ्यांदा हे गोल्ड मिळवण्याची कामगिरी भारताने केली आहे. २०१८ सालाप्रमाणेच यावेळीही भारतीय टीममध्ये अंचरता शरत कम, जी साथीयन, हरमीत देसाई आणि सुनील शेट्टी होते.

CWG 2022: टेबल टेनिसमध्ये भारताने जिंकले आणखी एक गोल्ड मेडल, मेन्स टीम इव्हेन्टमध्ये सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन
Follow us on

बर्निंगहम : कॉमनवेल्थ गेम्स २०२२मध्ये टेबल टेनिसमध्ये भारताने पहिले मेडल मिळवले आहे. मंगळवारी झालेल्या फायनल मॅचमध्ये भारताच्या पुरुषांच्या टीम इव्हेन्टमध्ये गोल्ड मेडल आपल्या नावे केले आहे. हरमीत देसाईच्या सिंगल्समध्ये ३-० च्या विजयाने, भारताने सिंगापूरला या फायनलमध्ये ३-१ ने हरवत हा किताब आपल्या नावे केला आहे. भारताने २०१८च्या गोल्ड कोस्टमध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये या इव्हेंटमध्ये दुसऱ्यांदा गोल्ड मिळवले होते. आता तिसऱ्यांदा हे गोल्ड मिळवण्याची कामगिरी भारताने केली आहे. २०१८ सालाप्रमाणेच यावेळीही भारतीय टीममध्ये अंचरता शरत कम(Achanta Sarat Kamal), जी साथीयन(Ji Sathian), हरमीत देसाई(Harmeet Desai) आणि सुनील शेट्टी(Sunil Shetty) होते.

पूर्ण इव्हेंटमध्ये शानदार खेळ दाखवत भारतीय टीमने चांगली सुरुवात केली. ग्रुप स्टेजमध्ये पहिल्यांदाच सिंगापूरला ३-० ने भारतीय टीमने पराभूत केले होते. मात्र फायनल मॅच अगदीच वेगळी झाली. भारतासाठी हरमित देसाई आणि जी साथियन या जोडीने डबल्समध्ये आपली मॅच ३-० ने जिंकत भारताला १-० ची बढत दिली. यानंतर भारताची आशा सर्वात अनुभवी असलेल्या भारतीय पैडलर अंचता शरत कमल यांच्यावर होती. मात्र सिंगल्सच्या मॅचमध्ये अटीतटीच्या लढतीत ४ गेम्सची मॅच झाली. मात्र त्यात १-३ ने पराभव स्वीकारावा लागला.

आता मॅच १-१ वर होती, अशा वेळी भारतीय टीमला दुसऱ्या सिंगल्समध्ये दमदार वापसी गरजेची होती. जी साथियन या मॅचसाठी उतरला मात्र पहिल्या गेममध्ये त्याचा पराभव झाला. मात्र हार न मानता तीन गेम्समध्ये दमदार वापसी करत त्याने ३-१ ने मॅच जिंकली. त्यामुळे भारताची बढत २-१ झाली. साथियन याच्या विजयानंतर, दोन मॅच होत्या. त्यापैकी एक मॅच जिंकण्याची गरज होती. पुढच्याच मॅचमध्ये हे काम हरमीत देसाईने करुन दाखवले. भारतीय स्टचारने सिंगापूरच्या खेळाडूला कोणतीही संधी दिली नाही, तिन्ही गेम जिंकत त्याने ही मॅच आपल्या नावे केली. त्याचबरोबर गोल्ड मेडलही भारताच्या नावे झाले. अशा प्रकाराने भारताने ग्रुप स्टेजवर फायनलमध्ये सिंगापूरला मात दिली.