गुरुग्राम जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर

| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

नवी दिल्ली : जगातील सर्वात प्रदूषित दहा शहरांमध्ये भारताच्या तब्बल सात शहरांचा समावेश आहे. यातील पाच शहरं देशाची राजधानी दिल्लीला लागून आहेत. एका सर्व्हेनुसार ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.  दिल्लीजवळचं गुरुग्राम हे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर असल्याचे या सर्व्हेमध्ये सांगण्यात आलं आहे. ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, आयक्यूएअर एअरव्हिज्युअल अँड ग्रीनपीस द्वारा प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीमध्ये 2018 […]

गुरुग्राम जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर
देशातील टॉप 10 प्रदूषित शहरांमध्ये यूपीतील आठ शहरांचा समावेश
Follow us on

नवी दिल्ली : जगातील सर्वात प्रदूषित दहा शहरांमध्ये भारताच्या तब्बल सात शहरांचा समावेश आहे. यातील पाच शहरं देशाची राजधानी दिल्लीला लागून आहेत. एका सर्व्हेनुसार ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.  दिल्लीजवळचं गुरुग्राम हे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर असल्याचे या सर्व्हेमध्ये सांगण्यात आलं आहे. ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, आयक्यूएअर एअरव्हिज्युअल अँड ग्रीनपीस द्वारा प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीमध्ये 2018 च्या दरम्यान प्रदूषणामध्ये गुरुग्राम सर्व शहरांपेक्षा पुढे आहे.

या सर्व शहरातील प्रदूषण हे PM2.5 च्या पार्टिकुलेट मीटरने मोजण्यात आले. हे प्रदूषक तत्व मनुष्याच्या फुप्फुस आणि रक्तामध्ये मिसळते. सर्वात जास्त प्रदूषित असलेल्या शहरात गुरुग्रामनंतर गाझियाबाद, तिसऱ्या क्रमांकावर फैसलाबाद (पाकिस्तान), चौथ्या क्रमांकावर फरिदाबाद, पाचव्या क्रमांकावर भिवाडीचा समावेश आहे. तर सहाव्या स्थानावर नोएडा, सातव्या, आठवव्या आणि नवव्या स्थानावर अनुक्रमे पाटणा (बिहार), लखनऊ (उत्तर प्रदेश) आणि चीनचे होटन शहर आहे. तर दहाव्या स्थानावर पाकिस्तानच्या लाहोरचा समावेश आहे.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, जगात सर्वात जलद गतीने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणजे भारत आहे. मात्र याच देशातील 22 शहरं सर्वात जास्त प्रदूषित असणाऱ्या टॉप 30 यादीत आहेत. या  यादीत पाच शहरं चीनची आहेत. दोन शहरं पाकिस्तानची आहेत आणि एक शहर बांगलादेशचे आहे. या आकड्यानुसार 2018 मध्ये चीनने प्रदूषण कमी करण्याच्या दिशेने चांगले काम केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत चीनमध्ये प्रदूषण 12 टक्क्यांनी कमी झाले आहे.

सर्वाधिक प्रदूषित शहरं

  1. गुरुग्राम (हरियाणा)
  2. गाझियाबाद (उत्तर प्रदेश)
  3. फैसलाबाद (पाकिस्तान)
  4. फरिदाबाद (उत्तर प्रदेश)
  5. भिवाडी (राजस्थान)
  6. नोएडा (उत्तर प्रदेश)
  7. पाटणा (बिहार)
  8. लखनऊ (उत्तर प्रदेश)
  9. होटन (चीन)
  10. लाहोर (पाकिस्तान)