अहमदनगर : सध्या वादाच्या भोवऱ्यात असलेले प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांची क्रेझ कायम असल्याचं पाहायला मिळतंय.
अहमदनगरला कोपरगाव शहरात झालेल्या इंदोरीकरांच्या कीर्तनाला रेकॉर्डब्रेक गर्दी पहायला मिळाली.
. काही संघटना त्यांच्या कीर्तनात विरोध करत असल्या तरी दुसरीकडे त्यांची लोकप्रियता कायम असल्याचं दिसतंय.
शिवजयंतीनिमित्ताने आयोजित केलेल्या त्यांच्या कीर्तनाला कोपरगावकरांनी उस्फूर्त गर्दी केली होती.
काही दिवसापूर्वी कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात आयोजित करण्यात आलेला इंदोरीकरांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता
इंदोरीकर महाराजांनी सम-विषम तारखांवरुन मुलगा की मुलगी याबाबतचं भाष्य केलं होतं. सम-विषम तिथीवरुन मुलगा-मुलगीबाबत भाष्य करुन वादात अडकलेल्या इंदोरीकर महाराजांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली होती.
प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्य केल्याने, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.