सावधान… तुम्ही वॉटरपार्कला जाण्याचा प्लॅन करताय? आधी ‘हे’ वाचा!

सावधान... तुम्ही वॉटरपार्कला जाण्याचा प्लॅन करताय? आधी 'हे' वाचा!

नागपूर : उन्हाळ्यात तुम्ही कुटुंब आणि मित्रांसह वॉटर पार्कमध्ये जाण्याचा बेत आखत असाल, तर थोडी काळजी घ्या. कारण नागपुरातील द्वारका वॉटर पार्कमध्ये संपूर्ण दिवस धमाल केल्यानंतर 30 पेक्षा जास्त तरुणांच्या त्वचेला त्रास झाला आहे.

नागपुरात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या 56 तरुण-तरुणींचा ग्रुप 28 एप्रिलला नागपूर जवळच्या द्वारका वॉटर पार्कमध्ये गेला होता. सर्वांनी दिवसभर वॉटर पार्कमध्ये विविध राईड्स आणि खेळांचा आनंद लुटला. संध्याकाळपर्यंत धमाल करुन हा ग्रुप नागपूरला परत आला. मात्र, परत आल्यावर दुसऱ्या दिवशी यातील अर्ध्याअधिक विद्यार्थ्यांच्या त्वचेवर इन्फेक्‍शन झालं. या ग्रुपमधील 30 हून अधिक तरुण-तरुणींना त्रास व्हायला सुरुवात झाली.काहींना तीव्र खाज यायला सुरुवात झाली, तर काहींच्या त्वचेवर पुरळ आली.

या संदर्भात त्यांनी एक तक्रार खापा येथील पोलीस स्टेशन केली आहे. पाण्यात क्लोरिन किंवा केमिकल्सचं प्रमाण जास्त असल्यानं इन्फेक्‍शन झालं. त्यामुळे उपचार आणि औषधाचा खर्च द्यावा, अशी मागणीही त्यांनी तक्रारीतून करण्यात आली आहे.

‘द्वारका’च्या मालकाचे म्हणणे काय आहे?

“नागपुरातील द्वारका वॉटर पार्कमधील पाण्याने स्कीन इनफेक्शन झाल्याची पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. पण  हे आरोप चुकीचे असल्याचं द्वारका वॉटर पार्कच्या मालकाचं म्हणणं आहे. पुलमधील पाणी स्वच्छ असून, अनेक लोक येतात. मग फक्त याच ग्रुपला इनफेक्शन कसं होऊ शकतं?” असंही द्वारका वॉटर पार्कचे मालक धर्मदास रमानी म्हणाले.

Published On - 3:00 pm, Wed, 8 May 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI