“कोरोना देशातून घालवायचाय”, इंदुरीकर महाराजांच्या नागरिकांना महत्त्वाच्या सुचना

निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवाहन केलं आहे (Indorikar Maharaj Instruction on Corona).

“कोरोना देशातून घालवायचाय, इंदुरीकर महाराजांच्या नागरिकांना महत्त्वाच्या सुचना
| Updated on: Mar 21, 2020 | 8:23 PM

अहमदनगर : निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवाहन केलं आहे (Indorikar Maharaj Instruction on Corona). यात त्यांनी रविवारी (22 मार्च) होणाऱ्या जनता कर्फ्यूच्या दिवशी मी घरीच असणार आहे, तुम्हीही घराबाहेर पडू नका, असं आवाहन केलं. त्यांनी एका पत्रकाद्वारे आपली सविस्तर भूमिका मांडली. तसेच नागरिकांना काही सुचनाही केल्या.

इंदुरीकर महाराज म्हणाले, “राज्यात 62 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आपलं गाव, आपलं शहर, आपला देश कोरोना मुक्त करायचा असेल तर प्रत्येकाने आपली जबाबदारी चोख पार पाडणे गरजेचे आहे. हा लढा कोणाही एकट्या दुकट्याचा  आणि निव्वळ शासन प्रशासनाचा नाही, तर सर्वांचा लढा आहे. तेव्हा खबरदारी घ्या. सर्व सुचनांचे कोटेकोरपणे पालन करा. प्रत्येकाने स्वतःसह आपल्या कुटुंबाला कोरोना विषाणूपासून दूर ठेवा.

घराबाहेर पडू नका, प्रवास टाळा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद द्या. शासनाला सहकार्य करा. वारंवार हात स्वच्छ करा. मी पण घरी आहे, तुम्ही पण बाहेर पडू नका, असंही इंदुरीकरांनी आवाहन केलं.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आहे. त्यामुळे इंदुरीकरांचेही किर्तनाचे कार्यक्रम 31 मार्चपर्यंत रद्द करण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या:

पुण्यात रक्ताचा तुटवडा, विभागीय आयुक्त म्हैसेकरांचं नागरिकांना आवाहन

Maharashtra corona | महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 64 वर, मुंबईत 8, पुण्यात 2 नवे रुग्ण

होम क्वारंटाईन तरुणाचा मुंबई ते गुलबर्गा रेल्वे प्रवास, रुग्णवाहिकेअभावी तरुण दोन तास दौंड रेल्वे स्थानकावर

Janta Curfew | मोनो, मेट्रो बंद, अनेक लोकल-एक्सप्रेस गाड्याही रद्द, घराबाहेर पडू नका!

संबंधित व्हिडीओ:


Indorikar Maharaj Instruction on Corona