Interesting Facts: नामचिन, भुरटे, सर्वच चोर थकले, रेल्वे रुळ का नाही येत चोरता? कारण वाचून बसेल धक्का

Railway track theft: रेल्वे रुळ चोरी करणे हे काही सोपं काम नाही. त्यामागे अनेक कारणं आहेत. पण तुम्हाला वाटतं असेल रेल्वे स्टेशन सोडले तर कुठेच सुरक्षा व्यवस्था दिसत नाही. मग तरीही रेल्वे रुळाची चोरी का होत नाही? त्यामागे ही कारणे आहेत.

Interesting Facts: नामचिन, भुरटे, सर्वच चोर थकले, रेल्वे रुळ का नाही येत चोरता? कारण वाचून बसेल धक्का
रेल्वे रुळ
| Updated on: Mar 22, 2026 | 2:54 PM

Why tracks not stolen: रेल्वे रुळाची चोरी करणे हे ऐकायला सोपं काम वाटतं. पण प्रत्यक्षात हे जवळपास अशक्य काम आहे. त्यामुळे अनेक नामचिन, भुरटे चोर रेल्वे रुळाची चोरी करण्यास धजावत नाहीत. त्यामागे काही मोठी कारणं आहेत. हे रेल्वे रुळ चोरले तरी ते विकणे सोपे काम नाही. त्यामुळे ही जोखीम कोणी घेत नाही. एकतर रेल्वे रुळ हा अत्यंत भरीव आणि वजनदार असतो. त्याचे वजन अनेक किलो असते. इतका वजनदार रुळ कापणे, उचलणे आणि त्याची विक्री करणे हे अत्यंत जोखमीचे कारण आहे. तर अनेक चोरांना यामुळे अपघात होईल आणि मोठ्या प्रमाणात जीवितहानी होईल या भीतीनेही अनेक जण ही चोरी करण्यास धजावत नाहीत.

लोखंड नाही पोलाद

रेल्वेचा रुळ हा साध्या लोखंडापासून तयार होत नाही. तर पोलाद, स्टीलचा खास वापर करण्यात येतो. रेल्वे रुळ इतका कठीण असतो की तो तोडणे आणि कापणे सोपे काम नाही. त्यासाठी एकदम खास मशीन आणि उपकरणांची आवश्यकता असते. ही उपकरणं बाजारात सहज उपलब्ध नसतात. तर हे रुळ जमिनीला अधिक घट्ट जोडलेले असतात. क्राँक्रिट, बोल्ट आणि क्लिपच्या सहाय्याने रुळ एकदम घट्ट जोडलेला असतो. त्याला खिळखिळ करणे सोपे काम नाही.

भंगारवाला अथवा इतर कोणी खरेदीस धजावत नाही

एक बाब चुकून एखाद्या ठिकाणी क्लिप उखळली असेल. रुळ जमिनीपासून वर आले असतील. कदाचित एखाद्याने ते सहज चोरले तरीही भंगारवाले अथवा इतर कोणी हा रुळ खरेदी करत नाही. कारण ही बाब समोर आल्यास भंगारवाल्याचे दिवाळेच निघते. त्याचे आयुष्य चार भिंतीच्या आत असते. याविषयी कायदे आणि नियम इतके कठीण आहेत की ही जोखीम मोठे आणि छोटे भंगारवाले घेत नाहीत. रेल्वे रूळाची सातत्याने तपासणी होत असते. त्यासाठी एक पथक सतत कार्यरत असते. रेल्वे पोलिसांच्या खबऱ्यांचे नेटवर्क अलर्ट असते. तर प्रवासी संघटनांचे पदाधिकारी सुद्धा त्या त्या पट्ट्यात अशा चोरट्यांवर लक्ष ठेवून असते.

Follow Us