पाकची 20 विमानं 10 किमी भारताच्या हद्दीत घुसली!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

नवी दिल्ली : पाकिस्तानने काल 20 विमानं भारताच्या हद्दीत घुसवल्याचे उघड झाले आहे. भारताच्या हद्दीत तब्बल 10 किलोमीटर आत पाकिस्तानच्या विमानांनी घुसखोरी केली. या विमानांमध्ये बॉम्ब होते. भारतीय लष्करी तळांना निशाणा करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता. मात्र, भारताच्या चोख प्रत्युत्तरामुळे ही विमानं माघारी फिरली. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळाला उद्धवस्त केले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून भारत-पाकिस्तान […]

पाकची 20 विमानं 10 किमी भारताच्या हद्दीत घुसली!
Follow us on

नवी दिल्ली : पाकिस्तानने काल 20 विमानं भारताच्या हद्दीत घुसवल्याचे उघड झाले आहे. भारताच्या हद्दीत तब्बल 10 किलोमीटर आत पाकिस्तानच्या विमानांनी घुसखोरी केली. या विमानांमध्ये बॉम्ब होते. भारतीय लष्करी तळांना निशाणा करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता. मात्र, भारताच्या चोख प्रत्युत्तरामुळे ही विमानं माघारी फिरली.

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळाला उद्धवस्त केले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून भारत-पाकिस्तान सीमेवर तणावाचं वातावरण आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण दिसत आहे. याचा बदला घेण्यासाठी भारतीय वायूसेनेने थेट पाकिस्तानमध्ये घुसून तेथील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या हल्ल्यात किमान 300 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. मात्र या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानकडून सतत गोळीबार करत शस्त्रसंधींचं उल्लंघन करण्यात येत आहे. आज सकाळीही पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केले, तर आता भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न पाकने केला.

पाकिस्तानच्या विमानांनी काल (27 फेब्रुवारी) जम्मू काश्मीरमधील नौसेरामध्ये घुसखोरी करत बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न केला. ही विमाने भारतीय वायूसेनेने वेळीच पिटाळून लावली. शिवाय पाकिस्तानचं प्रमुख F-16 हे विमान भारताने पाडलं. पाकिस्तानचं विमान दिसताच पाडा, असा आदेश भारतीय वायूसेनेला देण्यात आलाय. त्यामुळे दोन्ही देशांच्या वायूसेनेचा संघर्ष टोकाला पोहोचलाय.

भारत आणि पाकिस्तानच्या वायूसेनेतला संघर्ष वाढलाय. एकीकडे राजधानी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक सुरु आहे, तर दुसरीकडे दिल्लीसह देशातील प्रमुख शहरात हायअलर्ट जारी करण्यात आलाय. आज संध्याकाळी पहिल्यांदाच देशातील तिन्ही सेनादलाचे प्रमुख एकत्र येऊन पत्रकार परिषद घेणार आहे. तसेच भारतीय वायूसेनेला युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.