Vastu Shastra : शनिवारी करा हे सोपे उपाय, आजार आणि आर्थिक संकटातून मिळेल कायमची मुक्ती
शनिवार हा शनि देवांना समर्पित असतो. शनिवारी शनि देवांची पूजा प्रार्थना केल्यास घरातील सर्व दोष दूर होतात आणि घरात समृद्धी येते, असं धर्मशास्त्रामध्ये म्हटलं आहे. आज आपण शनिवारी करायच्या अशा काही सोप्या उपायांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमच्या घरातील सर्व दोष दूर होतील.

शनिवार हा शनि देवांना समर्पित वार आहे. त्यामुळे शनिवारला विशेष महत्त्व आहे, विशेष: ज्या लोकांना शनि देवांची साडेसाती सुरू असते अशा लोकांनी शनिवारी काही सोपे उपाय केल्यास त्यांना शनिदोषापासून मुक्ती मिळू शकते, शनि देवांना न्यायाची देवता म्हटलं आहे. शनि देव हे कर्म फळ दाता आहेत. म्हणजेच शनि देव प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देत असतात. त्यामुळे माणसाचे कर्म हे नेहमी चांगले असावेत असं धर्मशास्त्रात म्हटलं आहे. वास्तुशास्त्रामध्ये असे काही उपाय सांगितले आहेत, ते जर तुम्ही शनिवारी केले तर तुम्हाला आर्थिक संकट आणि घरातील आजारांपासून मुक्ती मिळू शकते. शनि देवांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील, चला तर मग जाणून घेऊयात या सोप्या उपायांबद्दल.
वास्तुशास्त्रानुसार शनिवारच्या दिवशी घराची साफसफाई ही नेहमी मिठाच्या पाण्यानं करावी, त्यासाठी फार काही नाही तुम्ही ज्या पाण्यानं घराची स्वच्छता करणार आहात, त्यामध्ये एक चमचाभर मीठ टाकावं, यामुळे घरातील सर्व वास्तुदोष दूर होतात. जर घरात पैसा टिकत नसेल किंवा तुमच्यावर कर्ज वाढलं असेल तर असे सर्व दोष दूर होतात. हा उपाय दर शनिवारी नियमित केल्यास घराला आर्थिक स्थैर्य लाभते आणि घरातील सर्व व्यक्तींना उत्तम आरोग्य लाभते.
शनिवारी एका काचेच्या ग्लासामध्ये पाणी भरून त्यामध्ये थोडं मीठ टाका आणि हा ग्लास नैऋत्य दिशेला ठेवा, जेव्हा या ग्लासामधील पाण्याची वाफ होईल तेव्हा पुन्हा हीच कृती करा हा उपाय त्या दिवसापुरता करावा, वास्तुशास्त्रानुसार हा उपाय केल्यास तुम्हाला आर्थिक स्थैर्य लाभते आणि सर्व प्रकारच्या आर्थिक संकटातून तुमची सुटका होते.
तसेच शनिवारी माशांना पिठाचे गोळे खाऊ घालावेत, या उपायामुळे तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी येते, घरातील वातावरण आनंदी राहातं असं वास्तुशास्त्रमध्ये सांगण्यात आलं आहे. तसेच शनिवारी नियमित सकाळी शनि देवांची पूजा करावी आणि शनि मंत्राचा जाप करावा. त्यामुळे शनि देवाचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
