वॉरेन बफे हे जगातील सर्वांत मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक आहेत. त्यांनी बर्थशायर हॅथवेच्या सीईओपदावरून निवृत्ती घेण्याचं जाहीर केलं आहे. ते जगातील पाचव्या क्रमांकाचे सर्वाधिक श्रीमंत व्यक्त आहेत. दरम्यान, तुम्हाला मालामाल करणारे वॉरेन बफे यांचे पाच फॉर्म्यूले जाणून घ्या.
बफे यांच्या मतानुसार ज्ञान ही सर्वाधिक मोठी गुंतवणूक आहे. बफे रोज पुस्तक वाचतात. नवी माहिती मिळवतात. शेअर बाजार असो किंवा अन्य तंत्रज्ञान त्यांना नेहमी काहीतरी नवं शिकायला आवडतं. तुम्ही जेवढं शिकता तेवढंच कमावता, असं मत बफे यांचं आहे.
बफे यांनी गुंतवणुकीचा मूलमंत्र दिला आहे. एखाद्या चांगल्या कंपनीची निवड करा आणि त्या कंपनीत दीर्घकालीन गुंतवणूक करा, असं ते सांगतात. ज्या कंपनीचे बिझनेस मॉडेल चांगले आहे, ज्या कंपनीची भविष्यात वाढ होण्याची शक्यता आहे, आहे, त्याच कंपनीत गुंतवणूक करावी असं ते सांगतात.
बफे हे गुंतवणुकीतील धोक्यांना घाबरत नाहीत. मात्र या धोक्यांवर मात कशी मिळवायची, याचा ते पुरेपूर अभ्यास करतात. कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करण्याआधी कंपनीची आर्थिक स्थिती, बाजाराची स्थिती, संभाव्य जोखमींचे विश्लेषण करा, असे बफे यांचे मत आहे.
यशासाठी स्वयंशिस्त फार महत्त्वाची आहे, असे बफे यांचे सांगणे आहे. बफे हे भावनेच्या आधारावर निर्णय घेत नाहीत.