जळगावात चोरीच्या घटनेत वाढ, सुरक्षेसाठी असलेले सीसीटीव्ही मात्र बंद

| Updated on: Dec 05, 2020 | 1:34 PM

जळगावच्या चौकाचौकात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे हे निकामी झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. (Jalgaon Crime increase CCTV Is not Working)

जळगावात चोरीच्या घटनेत वाढ, सुरक्षेसाठी असलेले सीसीटीव्ही मात्र बंद
Follow us on

जळगाव : राज्यात अनेक ठिकाणी गुन्हेगारी वृत्तात वाढ होताना पाहायला मिळत आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरी, सोनसाखळी चोरी तसेच इतर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. या सर्व गुन्ह्यांमध्ये आरोपीला पकडण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते. मात्र जळगाव शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे हे निकामी झाले आहेत. त्यामुळे नागरिकांची सुरक्षा व्यवस्था ही वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे. (Jalgaon Crime increase CCTV Is not Working)

कोणताही गुन्हा घडल्यानंतर अत्याधुनिक पोलीस यंत्रणेमुळे गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांना मदत होते. मात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी जळगावच्या चौकाचौकात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे हे निकामी झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

शहरातील अनेक सीसीटीव्ही निकामी झाले असून याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. कोणताही मोठा गुन्हा, चोरी, खून अशा गंभीर गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजद्वारे शोध घेतला जातो. मात्र हे सीसीटीव्ही कार्यरत नसल्याने नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे.

तसेच अनेक ठिकाणी सरकारी यंत्रणेकडून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत. शहरात अनेक दुकानांमध्ये किंवा जवळपास सर्वच दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा बसवली असते. त्यामुळे या यंत्रणेच्या माध्यमातून किंवा त्या दुकानदारांकडून आम्हाला गुन्हेगारापर्यंत पोहोचण्यात मदत मिळते, अशी प्रतिक्रिया राज्यातील पोलीस दलातर्फे देण्यात आली आहे.  (Jalgaon Crime increase CCTV Is not Working)

संबंधित बातम्या : 

Rekha Jare Murder | वादातून नाही, तर सुपारी देऊन हत्या, नगरच्या रेखा जरे हत्याकांडातील पत्रकार कोण?

बीडमध्ये शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न, संतप्त शेतकऱ्यांचा वाळू माफियांना घेराव