मानवंदना देताना वृद्धाच्या छातीत गोळी लागली, जागीच मृत्यू

जळगाव : सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाच्या वृद्ध वडिलांच्या मृत्यूनंतर अग्नीडाग देण्यापूर्वी मानवंदना म्हणून बंदुकीने हवेत फायरिंग केली. परंतु बंदूक अचानक लॉक झाली. बंदूक आडवी करून तपासात असताना अचानक एक गोळी शेजारी उभे असलेल्या एका वृद्धाच्या सरळ छातीत घुसल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.  जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील ही घटना आहे. पिंप्री येथील सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक […]

मानवंदना देताना वृद्धाच्या छातीत गोळी लागली, जागीच मृत्यू
महिला पहलवानासह भावावर झाडल्या गोळ्या
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

जळगाव : सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाच्या वृद्ध वडिलांच्या मृत्यूनंतर अग्नीडाग देण्यापूर्वी मानवंदना म्हणून बंदुकीने हवेत फायरिंग केली. परंतु बंदूक अचानक लॉक झाली. बंदूक आडवी करून तपासात असताना अचानक एक गोळी शेजारी उभे असलेल्या एका वृद्धाच्या सरळ छातीत घुसल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.  जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील ही घटना आहे.

पिंप्री येथील सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक विठ्ठल मोहकर (ह.मु.नाशिक) यांचे वडील श्रावण बारकू मोहकर (वय 85) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. दुपारी साधारण साडेचार वाजेच्या सुमारास त्यांची अंत्ययात्रा स्मशानभूमीत पोहचली. यावेळी श्रावण मोहकर यांना मानवंदना देण्यासाठी मोहकर यांचा मुलगा दीपक यांनी आपल्या बंदुकीमधून हवेत फायर केले.

दोन फायर व्यवस्थित झाले, परंतु तिसऱ्या फायरला बंदूक लॉक झाली. त्यामुळे दीपक यांनी बंदूक आडवी करून तिला बघत असतांनाच अचानक गोळी बाहेर निघाली आणि अंत्ययात्रेत आलेले तुकाराम वना बडगुजर (वय 60, रा. पिंपळगाव हरेश्वर,ता.पाचोरा) यांच्या छातीत घुसली. या दुर्घटनेत तुकराम बडगुजर हे गंभीर जखमी झाले. त्यांना जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी मयत घोषित केले.

नातेवाईकांमध्ये याबाबत समजोत्या संदर्भात चर्चा सुरु होती. दरम्यान, फायर करण्यासाठी परवानगी काढली होती का? एअरगन नेमकी कोणी चालवली याबाबत संभ्रम निर्माण होता. कारण काही जण दीपक यांनी गोळी चालवली असे सांगत होते. तर कुणी विठ्ठल मोहकर यांनी फायर केल्याचे म्हणत होते. मयत बडगुजर यांचे दोन्ही मुलं पोलीस खात्यात असल्याची माहिती आहे. यातील एक मुलगा जळगाव शनिपेठ पोलीस स्थानकात कार्यरत आहे. तर ज्याने गोळीबार केला, त्या दीपक मोहकर यांची सिक्युरिटी एजन्सी असल्याची माहिती आहे.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.