सुप्रिया सुळे यांच्यावर नवऱ्यावरून टीका; अजितदादा म्हणाले, सदानंद सुळे संसदेत पर्स घेऊन येतात का?

संविधान दिवस साजरा करण्याचं काम हे महायुतीच्या सरकारमध्ये करण्यात आलं. आम्ही संविधान बदलणार अशी वक्तव्य केली जात आहे. काँग्रेसने कधी संविधान दिन साजरा केला का? उलट काँग्रेसने बाबासाहेबांना निवडणुकीत पाडलं. काँग्रेसच्या काळात सतत संविधान दुरुस्ती करण्यता आली. एकूण 106 वेळा घटना दुरुस्ती झाली. यातील 90 वेळा काँग्रेसच्या काळात घटना दुरुस्ती करण्यात आली आहे, असं सांगतानाच जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत, तोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान कोणी बदलणार नाही, असं अजित पवार म्हणाले.

सुप्रिया सुळे यांच्यावर नवऱ्यावरून टीका; अजितदादा म्हणाले, सदानंद सुळे संसदेत पर्स घेऊन येतात का?
supriya suleImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 05, 2024 | 6:49 PM

नवऱ्याला संसदेत अलाऊड नसतं, कॅन्टीनमध्ये पर्स सांभाळत बसावं लागतं, असा टोला सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना लगावला होता. अजित पवार यांनी या टीकेचा समाचार घेतला आहे. सुनेत्रा पवार या खासदार झाल्यावर त्यांचा नवरा संसदेत पर्स घेऊन जाणार अशी टीका त्यांनी केली. मग मी बोलू का? तुम्ही संसदेत जाता तेव्हा सदानंद सुळे हे काय पर्स घेऊन येतात का मागे? आम्हाला देखील बोलता येतं, असा हल्ला चढवतानाच मी जर बोलायला लागलो तर तुम्हाला पळता भूई थोडी होईल. तुम्हाला थेट मुंबई गाठावी लागेल, असा इशाराच अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना नाव न घेता दिला.

अजित पवार हे बारामतीत आयोजित सभेत बोलत होते. त्यांच्या सभेत आज खुर्ची टाकल्या आहेत आणि आपल्या इथे तुम्ही सगळे जण खाली बसला आहात. जर आपण इथे खुर्ची लावली असती तर ही सभा चौपट झाली असती, असा दावा अजित पवार यांनी केला. भावनिक होऊन मतदान करुन चालणार नाही. कोण आपला विकास करणार हे पाहण महत्त्वाचं आहे. नात्याचं आणि गोत्याचं राजकरण करुन कधी विकास होत नाही हे आपण बारामतीकर यापूर्वी सुद्धा दाखवून दिल आहे, असं अजित पवार म्हणाले.

अंगाला भोकं पडली नाहीत

अमित शहा आणि मोदींवर टीका करुन, संसदरत्न मिळवून लोकसभा मतदारसंघाचा विकास होत नाही. बारामतीत पाण्याचा प्रश्न मोठा आहे. तो सोडवला पाहिजे, असा चिमटा अजितदादांनी काढला. मोदींची गॅरेंटी तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे मोदीजी बोलतात हा तर ट्रेलर आहे आणि आत्ता पिक्चर अजून बाकी आहे. आज माझ्यावर काही लोकांनी टीका केली. त्यामुळे माझ्या अंगाला काही भोकं पडली नाहीत, असं ते म्हणाले.

होय, दम देतो…

मी दम देतो असा सारखा प्रचार अनेक प्रचार सभांमधून हे करत आहेत. गेले 30 वर्ष असाच निवडून येत आहे का? दम देतो… हो देतो ना… एका अधिकाऱ्याने काम केलं नाही सांगून सुद्धा तरी मग कसं बोलायचं? मग त्याला बोलावं लागतं. तू काम करतो की नाही की गडचिरोलीला जातो का? हा दम नाही आहे, हा प्रश्न आहे, असं त्यांनी सांगितलं.

रडीचा डाव खेळू नका

शेवटच्या सभेत कोणी तरी तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न करेल कोणी तरी पाठ्या हा डोळ्यातून पाणी काढलं तर मी सुद्धा काढतो पाणी. रडीचा डाव खेळू नका. मी यांना जिल्हापरिषदेच तिकीट दिलं. तेव्हा साहेब नको बोलत होते. पण मी तरीही तिकीट दिलं, अशी टीका त्यांनी केली.

पदाधिकाऱ्यांना कळवा

तुम्हाला आम्ही राजकारणाचे बाळकडू पाजले आहे आणि तुम्ही आम्हाला राजकरण शिकवत आहात? तुमच्यापेक्षा मी जास्त उन्हाळे आणि पावसाळे बघितले आहेत. सोशल मीडियावर काहीपण व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत आणि त्यामुळे आता काही तास शिल्लक आहेत मतदानाला. त्यामुळे तुम्हाला असा काही चुकीच वाटलं तर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना कळवा, असं आवाहनही त्यांनी केलं.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.