अजित पवार यांच्याकडून रोहित पवार यांची रडण्याची नक्कल, पाहा नेमकं काय केलं?

रोहित पवार यांना आज बारामतीत भाषण करताना अश्रू अनावर झाले. यावरुन अजित पवार यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला. अजित पवार यांनी यावेळी रोहित पवार यांची नक्कल केली.

अजित पवार यांच्याकडून रोहित पवार यांची रडण्याची नक्कल, पाहा नेमकं काय केलं?
अजित पवार यांच्याकडून रोहित पवार यांच्या रडण्याची नक्कल
Follow us
| Updated on: May 05, 2024 | 7:19 PM

आमदार रोहित पवार आज भाषण करताना भर मंचावर ढसाढसा रडले. ते राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याबद्दल बोलताना भावूक झाले. बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आयेजित शेवटच्या सभेत ते बोलत होते. यावेळी रोहित पवार यांना अश्रू अनावर झाले. रोहित पवारांनी आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटावरही टीका केली. त्यावर अजित पवारांनीदेखील प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार यांनी यावेळी रोहित पवार यांची नक्कल केली. “माझ्यावर आज काही लोकांनी टीका केली त्यामुळे माझ्या अंगाला काही भोक पडली नाहीत. मी दम देतो असा सारखा प्रचार अनेक प्रचारसभांमधून हे करत आहेत. गेले ३० वर्ष असाच निवडून येत आहे का? दम देतो… हो देतो ना. एका अधिकाऱ्याने काम केलं नाही सांगूनसुद्धा तरी मग कसं बोलायचं मग? त्याला बोलावं लागतं. तू काम करतो की नाही की गडचिरोलीला जातो का? हा दम नाही. हा प्रश्न आहे”, असं अजित पवार म्हणाले.

“शेवटच्या सभेत कोणी तरी तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न करेल. कोणीतरी पठ्या हा डोळ्यातून पाणी काढलं. तर मी सुद्धा काढतो पाणी”, असं म्हणत अजित पवार यांनी रोहित पवारांची नक्कल केली. “रडीचा डाव खेळू नका. मी यांना जिल्हा परिषदेचं तिकीट दिलं आणि तेव्हा शरद पवार नको बोलत होते. तुम्हाला आम्ही राजकारणाचे बाळकडू पाजले आहेत आणि तुम्ही आम्हाला राजकरण शिकवत आहात? तुमच्या पेक्षा मी जास्त उन्हाळे आणि पावसाळे बघितले आहेत”, अशा शब्दांत अजित पवारांनी रोहित पवारांना प्रत्युत्तर दिलं.

‘भावनिक होऊन मतदान करुन चालणार नाही’

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना बहुमताने विजयी करा. आपल्याला निवडणुका या नव्या नाहीत. आज 6 वाजता प्रचार संपणार आहे. त्यामुळे आपण नियम मोडायला नकोत. पुढचे 2 दिवस महत्त्वाचे आहेत. आज दिवसभरात 4 सभा घेतल्या. ही शेवटची सांगता 5 वी सभा आहे. भावनिक होऊन मतदान करुन चालणार नाही. कोण आपला विकास करणार? हे पाहणं महत्वाचं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात पाण्याचा प्रश्न मोठा आहे. नात्याचं आणि गोत्याचं राजकरण करुन कधी विकास होत नाही. हे आपण बारामतीकर यापूर्वी सुद्धा दाखवून दिलं आहे”, असं अजित पवार म्हणाले.

“केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करुन, संसदरत्न मिळवून लोकसभा मतदारसंघाचा विकास होत नाही. मोदींची गॅरंटी तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे मोदीजी बोलले, हा तर ट्रेलर आहे आणि आता पिक्चर अजून बाकी आहे”, असंदेखील अजित पवार म्हणाले. “सोशल मीडियावर काहीपण व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत आणि त्यामुळे आता काही तास मतदानाला शिल्लक आहेत. त्यामुळे तुम्हाला असं काही चुकीचं वाटलं तर महायुतीच्या पदाधिकाऱ्याला कळवा. काही जण आयुष्यात कधी कुस्ती खेळले नाहीत आणि ते कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष झाले आहेत आणि तुम्हाला चितपट करता येतं का? काही डाव तुम्हाला माहीत आहे का?”, असं अजित पवार म्हणाले.

‘…तर दिवस आणि रात्र सोबत राहा’

“परभणीची जागा आपल्या वाट्याला आली होती. पण सोशल इंजिनिअरिंग करायचं होतं. त्यामुळे ती जागा आपण महादेव जानकर यांना सोडली आहे. आपण टीका करण्याचं टाळत आहोत. आपलं भाषण हे विकासाच्या मुद्द्यावर आहे. त्यामुळे मी जास्त टीका करत नाही. माळेगावमध्ये थोडी गडबड सुरु आहे. त्यामुळे दिवसा एक आणि रात्री एक करू नका. राहायचं असेल असेल तर दिवस आणि रात्र सोबत राहा”, असं आवाहन अजित पवारांनी केलं.

“संविधान दिवस साजरा करण्याचं काम हे महायुतीच्या सरकारात करण्यात आलं आणि आम्ही संविधान बदलणार अशी वक्तव्य हे करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकीत पाडण्याचं काम हे या काँग्रेसने केलं आहे. १०६ वेळा संविधानात घटना दुरुस्ती करण्यात आली आहे आणि यातील ९० वेळा घटना दुरुस्ती ही काँग्रेसच्या काळात झाली आहे. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत हे संविधान कोणी बदलू शकत नाही”, असं अजित पवार यांनी ठणकावून सांहितलं.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.