Janta Curfew : पोलिसांचा तिसरा डोळा ठरला ‘ड्रोन’

पंतप्रधानांनी देशातील नागरिकांना जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं आणि नागरिकांनी पंतप्रधानांच्या या आवाहनाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

Janta Curfew : पोलिसांचा तिसरा डोळा ठरला 'ड्रोन'
Follow us
| Updated on: Mar 22, 2020 | 4:52 PM

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी देशात आज (22 मार्च) सकाळी सात वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू (Janta Curfew Live) म्हणजे एकप्रकारची संचारबदी लागू करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्री मोदींनी देशातील नागरिकांना जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईसह ठिकठिकाणी जनता कर्फ्यूला उस्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत  (Janta Curfew Live)आहे.

उस्मानाबादमध्ये जनता कर्फ्यूला 100 टक्के प्रतिसाद पाहायला मिळत आहे. गर्दीवर आणि नागरिकांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी उस्मानाबाद पोलिसांकडून ड्रोनचा वापर केला आहे. पोलिसांनी वापरलेले ड्रोन हे त्यांच्यासाठी तिसरा डोळा ठरले आहेत. पोलिसांनी (Janta Curfew Live) 7 किलोमीटर परिसरात आणि अवकाशातून 2 किमी उंचीवरुन एका ठिकाणाहून नियंत्रण तसेच पाहणी करणे शक्य झाले .

उस्मानाबाद शहरातील मुख्य चौक, बसस्थानक परिसरासह गल्लीबोळात कुठे काय सुरु आहे हे पोलिसांना ड्रोनमुळे समजतं आहे. तर शहरातील मुख्य चौकात ड्रोन असल्याने नागरिकांवरही नजर राहिली. त्यांचं बरोबर पोलीस बंदोबस्ताचा स्थितीचा आढावाही घेत गरजेनुसार पोलीस पथके कुठे पाठवायची आणि बंदोबस्त कसा ठेवायचा हे ठरवले.

पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन यांच्या संकल्पनेतून प्रथमच उस्मानाबाद पोलिसांनी ड्रोनचा वापर करीत आकाशातून छायाचित्र घेत नियंत्रण ठेवले. ड्रोन हे बंदोबस्ताचा काळात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासह आरोपीची ठिकाणे शोधण्यासाठी उपयोगी असल्याने आगामी काळात याचा वापर  (Janta Curfew Live) करण्याचा मानस पोलीस अधीक्षक रोशन यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra Lock Down : महाराष्ट्रात लागू केलेलं कलम 144 नेमकं काय?

संपूर्ण महाराष्ट्रात कलम 144 अर्थात जमावबंदी लागू, नाईलाजास्तव मुख्यमंत्र्यांचा निर्णय

जमावबंदी ते लॉक डाऊन, मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाच्या 9 घोषणा

Corona Death India | देशात ‘कोरोना’चा सहावा बळी, पाटणामध्ये एकाचा मृत्यू

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.