बिहारमध्ये प्रचारादरम्यान गदारोळ, जनता दल राष्ट्रवादी पार्टीच्या उमेदवारावर गोळीबार

| Updated on: Oct 25, 2020 | 12:03 AM

बिहारमध्ये जनता दल राष्ट्रवादी पार्टीचे उमेदवार नारायण सिंह यांच्यावर काही लोकांनी प्रचारादरम्यान गोळीबार केला (Janta dal rashtrawadi party candidate shot dead in Bihar).

बिहारमध्ये प्रचारादरम्यान गदारोळ, जनता दल राष्ट्रवादी पार्टीच्या उमेदवारावर गोळीबार
Follow us on

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी असताना धक्कादायक घटना घडली आहे. जनता दल राष्ट्रवादी पार्टीचे उमेदवार नारायण सिंह यांच्यावर काही लोकांनी शनिवारी (24 ऑक्टोबर) संध्याकाळी प्रचारादरम्यान गोळीबार केला. यामध्ये नारायण सिंह यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण बिहार हादरलं आहे (Janta dal rashtrawadi party candidate shot dead in Bihar).

नारायण सिंह यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोघांना प्रचारात सामील झालेल्या लोकांनी पकडून प्रचंड मारहाण केली. या मारहाणीत एका हल्लेखोराचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या हल्लेखोराला पोलिसांनी पकडलं आहे. पोलिसांनी हल्लेखोराकडून मिळालेली पिस्तूल जप्त केली आहे. दरम्यान, या गदारोळात नारायण सिंह यांच्या एका समर्थकाचादेखील मृत्यू झाला आहे.

नारायण सिंह हे बिहारच्या शिवहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. या भागात 3 नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. नारायण सिंह हेदेखील शनिवारी प्रचारात व्यस्त होते. ते शिवहर जिल्ह्यातील हाथरस गावात प्रचारासाठी आले होते.

नारायण सिंह आपल्या कार्यकर्त्यांसह गावात पायी प्रचार करत होते. यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघांनी नारायण सिंह यांच्यावर गोळीबार केला. त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना तातडीने शिवहर रुग्णालयात दाखल केलं. पण त्यांची प्रकृती नाजूक असल्याने त्यांना सीतामढीच्या रुग्णालयात पाठवण्यात आलं. पण सीतामढी जात असताना रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला (Janta dal rashtrawadi party candidate shot dead in Bihar).

संबंधित बातम्या : 

 बिहार विधानसभा निवडणुकीतील तीन कट्टर विरोधक एकत्र! काय आहे कारण?