बिहारमध्ये प्राध्यापक नियुक्तीत भ्रष्टाचाराचा आरोप असणारा शिक्षक शिक्षणमंत्री, विरोधकांकडून जोरदार टीका

| Updated on: Nov 17, 2020 | 7:43 PM

पाटणा : बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केलेल्या मेवालाल चौधरी यांना पहिल्यांदाच मंत्रिपद देत थेट शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. मात्र, यानंतर विरोधकांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह भाजपवर सडकून टीका केली आणि प्रश्न उपस्थित केले. मेवालाल चौधरी यांच्यावर सहाय्यक प्राध्यापकाच्या नियुक्तीत भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप आहे. या आरोपांविषयी विचारणा केली असता स्वतः […]

बिहारमध्ये प्राध्यापक नियुक्तीत भ्रष्टाचाराचा आरोप असणारा शिक्षक शिक्षणमंत्री, विरोधकांकडून जोरदार टीका
Follow us on

पाटणा : बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केलेल्या मेवालाल चौधरी यांना पहिल्यांदाच मंत्रिपद देत थेट शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. मात्र, यानंतर विरोधकांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह भाजपवर सडकून टीका केली आणि प्रश्न उपस्थित केले. मेवालाल चौधरी यांच्यावर सहाय्यक प्राध्यापकाच्या नियुक्तीत भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप आहे. या आरोपांविषयी विचारणा केली असता स्वतः मेवालाल यांनी बोलणं टाळलं आहे (JDU leader who is accused in Corruption become Education Minister of Bihar).

मेवालाल चौधरी यांनी आपल्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवर बोलणं टाळलं असलं, तरी संयुक्त जनता दलाने त्यांचा बचाव करताना हे आरोप षडयंत्राचा भाग असल्याचा दावा केलाय. मेवालाल चौधरी यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना सहाय्यक प्राध्यापकाच्या नियुक्तीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा आत्ता येण्याचा काहीच संबंध नसल्याचं म्हटलं. तसेच विकासावर बोलावं असं सांगितलं.

मेवालाल चौधरी म्हणाले, “तुम्ही विकासावर बोला. राज्यात कशाप्रकारे विकास व्हावा, सर्व ठिकाणी विकास व्हावा. संपर्क आणि संवाद माध्यमं वाढावी, शिक्षण आणि शेती चांगली व्हावी. आज आम्ही विकसित बिहारवर बोलत आहोत. आमच्या नेत्यांचाही तोच उद्देश आहे आणि आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत.”

सुशील मोदी ज्या भ्रष्टाचारी आमदाराला शोधत होते, त्यांना नितीश कुमारांनी मंत्री केले : राजद

दुसरीकडे मेवालाल यांना शिक्षणमंत्री केल्यानंतर तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राजदने ट्विट करत म्हटलं, “भाजप नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी ज्या भ्रष्टाचारी आमदाराचा शोध घेत होते त्याला नितीश कुमार यांनी मंत्री बनवलं आहे.’

मेवालाल यांच्यावरुन विचारल्या जात असलेल्या प्रश्नांना उत्तर देताना जेडीयू प्रवक्ते अजय आलोक म्हणाले, “या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. असं असतानाही हे आरोप करुन विरोधक उच्च न्यायालयावर प्रश्न उपस्थित करत आहेत. कुशवाहा समाजाने एनडीएला मतदान केल्याने विरोधीपक्ष मेवालाल चौधरी यांना लक्ष्य करत आहेत.

मेवालाल चौधरी कोण आहेत?

जेडीयूच्या कोट्यातून शिक्षणंत्री झालेले मेवालाल चौधरी पहिल्यांदा कॅबनेटमध्ये सहभागी होत आहेत. ते बिहारच्या तारापूर विधानसभा मतदारसंघातून जेडीयूच्या तिकिटावर दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. मेवालाल चौधरी 2015 मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. त्याआधी ते शिक्षक होते.

संबंधित बातम्या :

कपिल सिब्बल यांच्यामुळे देशातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या, अशोक गेहलोतांची ट्विटची सरबत्ती

तारकिशोर आणि रेणू देवींना उपमुख्यमंत्रिपद; भाजपचा ‘हा’ आहे गेम प्लान!

इंजिनीअर ते मुख्यमंत्री, नितीश कुमार यांची धगधगती कारकीर्द!

संबंधित व्हिडीओ :

JDU leader who is accused in Corruption become Education Minister of Bihar