इंजिनीअर ते मुख्यमंत्री, नितीश कुमार यांची धगधगती कारकीर्द!

नितीश कुमार यांचा 7 दिवसात खुर्ची सोडावे लागण्याची वेळ ते सातव्यांदा मुख्यमंत्री होण्याचा प्रवास थक्क करणारा आहे

इंजिनीअर ते मुख्यमंत्री, नितीश कुमार यांची धगधगती कारकीर्द!
Follow us
| Updated on: Nov 16, 2020 | 4:51 PM

पाटणा : संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) अध्यक्ष नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी पुन्हा एकदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल फागू चौहान (Bihar Governor Phagu Chauhan) यांनी नितीश कुमार यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. नितीश कुमार सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले.  (Bihar Election Result 2020 Nitish Kumar political journey from Student to Bihar CM)

नितीश कुमार यांची काल औपचारिकपणे  राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (NDA) विधीमंडळ नेते म्हणून निवड करण्यात आली होती. यानंतर नितीश कुमारांनी राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावाही केला. नितीश कुमार यांनी आज सातव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असली, तरी यापूर्वी एकदा त्यांना केवळ सात दिवसात सत्ता सोडावी लागली होती. नितीश कुमार यांचा 7 दिवसात पद सोडण्यापासून ते 7  सातव्यांदा मुख्यमंत्री होण्याचा प्रवास थक्क करणारा आहे (Bihar Election Result 2020 Nitish Kumar political journey from Student to Bihar CM)

नितीश कुमार ज्येष्ट स्वातंत्र्य सैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश नारायण (जेपी) यांच्या विद्यार्थी आंदोलनात तयार झाले. त्यांनी 3 मार्च 2000 रोजी पहिल्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याआधी केवळ 6 वर्षांपूर्वी त्यांनी जनता पक्षातून बाहेर पडत आपला स्वतःचा पक्ष स्थापन केला होता. विशेष म्हणजे यावेळी आपल्याकडे बहुमताचा आकडा नाही हे माहिती असतानाही नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची जोखीम उचलली होती. त्यामुळे केवळ आठवडाभरात त्यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागली.

5 वर्षांनी पुन्हा बिहारच्या राजकारणाने खांदेपालट केला आणि आठवडाभराचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आतापर्यंत नितीश कुमारांनी एकूण 6 वेळा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. मात्र, या काळात त्यांनी दिलेल्या आश्वासनांपैकी काही बिहार सत्यात उतरलाय, तर बराच बाकी आहे. त्यातच आता ते सातव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.

इंजिनिअरींगचं शिक्षण आणि जेपी आंदोलन

बिहारच्या बख्तियारपूर जिल्ह्यात जन्मलेल्या नितीश कुमार यांचं सुरुवातीचं शिक्षण याच जिल्ह्यातील श्री गणेश हायस्कूलमध्ये झालं. नंतर त्यांनी पाटणाच्या इंजिनिअरींग कॉलेजमधून मॅकेनिकल इंजीनियरींगचं शिक्षण पूर्ण केलं. याच काळात ते जयप्रकाश नारायण यांच्या विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले. 70 च्या दशकात देशात मोठी राजकीय उलथापालथ झाली. देशभरात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविरोधात आंदोलन उभं राहिलं. त्याचं नेतृत्व बिहारने केलं.

18 मार्च 1974 रोजी पाटणातील विद्यार्थी आणि युवकांनी सुरु केलेलं आंदोलन जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वात देशभर पसरलं. यात केंद्रातील इंदिरा गांधी सरकारविरोधात प्रचंड असंतोष व्यक्त झाला. या आंदोलनात नितीश कुमार यांनी देखील सहभाग घेतला होता. या आंदोलनानंतर देशात आणीबाणी घोषित झाली. त्यानंतर नितीश कुमार यांना देखील भोजपूर जिल्ह्यातील दुबोली गावातून अटक झाली. याच काळात नितीश एक नेते म्हणून घडले. त्यांनी जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, कर्पूरी ठाकुर आणि जॉर्ज फर्नांडिस या देशातील दिग्गज नेत्यांकडून राजकारणाचे धडे घेतले.

नितीश कुमार यांच्या राजकारणाची सुरुवात

आणीबाणी संपल्यावर 1977 मध्ये बिहारची विधानसभा निवडणूक झाली. येथूनच नितीश कुमार यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. नितीश नालंदाच्या हरनौत विधानसभा मतदारसंघातून जनता पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढले आणि हरले. 1980 मध्ये ते लोकदलाचे उमेदवार होते. तेव्हा दुसऱ्यांदाही ते पुन्हा हरले. 1985 मध्ये अखेर नितीश लोकदलाच्या तिकिटावर हरनौतमधून आमदार झाले.

1987 मध्ये नितीश कुमार बिहारच्या युवक लोकदलाचे अध्यक्ष झाले. 1989 मध्ये त्यांच्याकडे जनता दलाच्या महासचिव पदाची जबाबदारी देण्यात आली. 1989 हे वर्ष नितीश यांच्या राजकीय करिअरसाठी महत्त्वाचं राहिलं. यावर्षी नितीश 9 व्या लोकसभा निवडणुकीत निवडून आले आणि खासदार झाले. यानंतर 1990 मध्ये एप्रिल ते नोव्हेंबर ते पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांच्या केंद्रातील सरकारमध्ये कृषी आणि सहकारी मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री झाले.

समता पक्षाची स्थापना आणि भाजपसोबत आघाडी

1991 मध्ये लोकसभा निवडणुकीत नितीश पुन्हा एकदा खासदार झाले. जवळपास 2 वर्षांनंतर 1993 मध्ये नितीश कुमार यांना कृषी समितीचं प्रमुखपद मिळालं. या दरम्यान, 1994 मध्ये नितीश जनता पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत समता पक्षाची स्थापना केली. मात्र, समता पक्ष 1995 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत हारला. या पराभवानंतर नितीश कुमार यांनी भाजपसोबत आघाडी केली.

रेल्वे मंत्री ते आठवडाभराचे मुख्यमंत्री असा प्रवास

1996 आणि 1998 च्या लोकसभा निवडणुकीत नितीश पुन्हा खासदार म्हणून निवडून आले. 1998-99 पर्यंत ते केंद्रीय रेल्वे मंत्री होते. वर्ष 2000 मध्ये नितीश यांच्या राजकीय प्रवासाला कलाटणी मिळाली. या वर्षी नितीश पहिल्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले. त्यांचा हा कार्यकाळ 3 मार्च 2000 ते 10 मार्च 2000 असा केवळ आठवडाभराचा राहिला. मात्र, याच वर्षी ते वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय कृषी मंत्री झाले. 2001 मध्ये नितीश यांच्याकडे रेल्वेचा अतिरिक्त प्रभार पण आला.

2004 च्या लोकसभा निवडणुकीत नितीश पुन्हा एकदा निवडून आले. मात्र, त्याच्या पुढच्याच वर्षी नितीश पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री झाले. वर्ष 2005 मध्ये नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले. 2010 मध्ये बिहारच्या जनतेने नितीश यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवलं. मात्र, कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी घेत नितीश यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. तसेच जीतन राम मांझी यांना मुख्‍यमंत्री बनवलं.

लालू-नितीश आघाडी आणि बिहारमधील सत्तास्थापन

22 फेब्रवारी 2015 रोजी नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या निवडणुकीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील आघाडीचा पराभव केला आणि महागठबंधनचं सरकार आलं. मात्र, लालू प्रसाद यादव यांच्या राजद आणि नितीश कुमार यांच्या जेडीयूचा प्रवास फार काळ टिकला नाही. 18 वर्षांनी एकत्र आलेले हे दोन्ही पक्ष पुन्हा वेगळे झाले. 20 महिन्यांनी 26 जुलै रोजी नितीश कुमार यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. तसेच 15 तासात भाजपच्या मदतीने पुन्हा एकदा सत्ता स्थापन केली.

संबंधित बातम्या :

जनादेश नितीश कुमारांविरोधात, फक्त 40 जागा जिंकून मुख्यमंत्रिपद कसे? राजदचा सवाल

बिहारच्या उपमुख्यमंत्रिपदासाठी भाजपकडून नवा चेहरा?

नितीश कुमार यांची विधिमंडळ नेतेपदी निवड, सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होणार, सोमवारी शपथविधी

व्हिडीओ पाहा :

Bihar Election Result 2020 Nitish Kumar political journey from Student to Bihar CM

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.