AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नितीश कुमार यांची विधिमंडळ नेतेपदी निवड, सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होणार, सोमवारी शपथविधी

जेडीयूचे प्रमुख नितीश कुमार सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होणार आहेत. आज एनडीएच्या बैठकीमध्ये नितीश कुमार यांचं नावं विधीमंडळ नेतेपदी निश्चित करण्यात आलं आहे.

नितीश कुमार यांची विधिमंडळ नेतेपदी निवड, सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होणार, सोमवारी शपथविधी
| Updated on: Nov 15, 2020 | 2:27 PM
Share

पाटणा :  जेडीयूचे प्रमुख नितीश कुमार सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होणार आहेत. आज एनडीएच्या बैठकीमध्ये नितीश कुमार यांचं नावं विधीमंडळ नेतेपदी निश्चित करण्यात आलं आहे. सोमवारी सकाळी11.30 वाजता नितीश कुमार यांचा शपथविधी होणार आहे. (Nitish Kumar to become Bihar CM for the seventh time, likely to be sworn on Monday)

69 वर्षांचे नितीश कुमार सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. उद्या सकाळी साडे अकरा वाजता राजभवनात त्यांचा शपथविधी पार पडणार आहे. बिहारचे राज्यपाल फागू चव्हाण नितीश कुमार यांना शपथ देतील.

आपल्या राजकीय कारकीर्दीत सातव्यांदा तर सलग चौथ्यांदा नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान होतील. सलग तीन वेळा मुख्यमंत्रिपद भुषवल्यानंतर अँटीइन्कमबन्सीचा फटका नितीश कुमार यांना बसला. मात्र त्याचा त्यांच्यावर काहीही फरक पडला नाही. निवडणुकीपूर्वी भाजपने दिलेल्या शब्दाच्याआधारे नितीश कुमार सोमवारी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.

नितीश कुमार यांच्याबरोबर काही मंत्री देखील शपथ घेतील. बिहारमध्ये भाजपकडून उपमुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत काही महत्त्वाचे नेते आहेत. भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी काही नेत्यांमध्ये चढाओढ असल्याचं पाहायला मिळतंय. नितीश कुमार मुख्यमंत्रिपदी जरी विराजमान झाले तरी मंत्रिमंडळातील महत्त्वाची खाती भाजपकडे जाणार असल्याच्या चर्चा आहेत. कारण जेडीयूच्या तुलनेत भाजप आमदारांची संख्या जास्त आहे. भाजपचे जास्त आमदार असून देखील जेडीयूला मुख्यमंत्रिपद मिळणार असल्याने अगोदरच पक्षात नाराजीचा सूर आहे. अशा परिस्थितीत काही महत्त्वाची खाती भाजपकडे राहणार असल्याचे आडाखे काही राजकीय निरीक्षक बांधताना दिसत आहेत.

बिहार विधानसभा निवडणुकीत आरजेडी क्रमांक एकचा पक्ष ठरला. तेजस्वी यादव यांच्या झंझावाती प्रचाराला लोकांनी जोरदार प्रतिसाद देत आरजेडीचे 75 जागांवर उमेदवार विजयी झाले. भाजपला या निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळालं. भाजपने टाकलेले सर्व डावपेच यशस्वी झाले. एक्झिट पोलमध्ये महागठबंधनची सरशी होणार, असं चित्र दाखवलं गेलं मात्र निकालानंतर एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं.

नितीश कुमार यांचे 43 आमदार निवडून आले आहेत तर भाजपचे 74 उमेदवार निवडून आले आहेत. भाजपच्या तुलनेत नितीश कुमार यांच्या जेडीयूचे आमदार खूपच कमी आहे. अशाही परिस्थितीत नितीश कुमार यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडणार असल्याने भाजपमध्ये अंतर्गत नाराजी असल्याची चर्चा आहे.

(Nitish Kumar to become Bihar CM for the seventh time, likely to be sworn on Monday)

संबंधित बातम्या

एनडीएची दुसऱ्यांदा बैठक, नितीश कुमार यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड होणार, भाजपमध्ये अंतर्गत नाराजी?

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.